अरुण जेटली अनंतात विलीन; मुलाने दिला मुखाग्नी!

देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी (24 ऑगस्ट) निधन झालं. एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 • News18 Lokmat
 • | August 25, 2019, 17:21 IST |
  LAST UPDATED 4 YEARS AGO

  हाइलाइट्स

  15:33 (IST)

  अरुण जेटली अनंतात विलीन

  14:53 (IST)

  अनेक दिग्गज नेते निगम बोध घाटावर उपस्थित
   

  14:28 (IST)

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज निगम बोध घाटावर उपस्थित

  14:2 (IST)

  निगम बोध घाटावर अरुण जेटली यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार 

  13:11 (IST)

  अरुण जेटली यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, जेटलींचं पार्थिव भाजप मुख्यालयातून निगम बोध घाटाकडे रवाना

  13:9 (IST)

  केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन आणि पियुष गोयल, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी अरुण जेटली यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन ो

  12:20 (IST)

  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुण जेटलींना वाहिली श्रद्धांजली

  नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी (24 ऑगस्ट) निधन झालं. एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 66 वर्षांचे होते. जेटली यांनी आपल्या कार्यकाळात नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणले.  श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती आणि शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील निगम बोध घाट येथे मुलगा रोहन यांच्या मुलाने अरुण जेटली यांना मुखाग्नी दिला.