जाहिरात
मराठी बातम्या / देश / ...तर 10 फूट खोल खड्ड्यात पुरलं जाईल, शिवराज सिंह चौहान यांनी दिला इशारा

...तर 10 फूट खोल खड्ड्यात पुरलं जाईल, शिवराज सिंह चौहान यांनी दिला इशारा

...तर 10 फूट खोल खड्ड्यात पुरलं जाईल, शिवराज सिंह चौहान यांनी दिला इशारा

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chouhan)यांनी आपल्या भाषणातून गुन्हेगारांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की ‘माफिया (Mafia) लोकांनी नीट ऐकावं, जर त्यांनी काही गडबड केली तर त्यांना 10 फूट (10 Feet) खोल खड्यात (Pit) पुरलं जाईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

होशंगाबाद, 26 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशभरातील शेतकरी मोठ्या संख्येने कृषी कायद्याला (Farm acts) विरोध करत आहेत. तसेच आंदोलनकर्ते शेतकरी (Farmer Protest) आणि केंद्र सरकार (Central government) यांच्यात अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नाही. अशातच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chouhan) होशंगाबाद येथील ‘शेतकरी सन्मान निधी योजना’ या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी एक भाषणही केलं. या भाषणादरम्यान त्यांनी गुन्हेगार आणि माफियांना इशारा दिला. ते म्हणाले की ‘माफिया लोकांनी नीट ऐकावं, जर त्यांनी काही गडबड केली तर त्यांना 10 फूट खोल खड्यात पुरलं जाईल. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान दिवंगत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ जनतेला ‘सुशासन’ देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी व्यासपीठावरून सांगितलं. यावेळी त्यांनी राज्यात लोकांच्या जमीन बळकवणाऱ्या आणि माफिया लोकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, राज्यातील लोकांच्या जमिनी बळकवणाऱ्यांनो आणि माफियांनो लक्ष देऊन ऐका, जरा जरी गडबड केली तर 10 फूट खड्यात पुरलं जाईल. यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी व्यासपीठावरून जिल्हाधिकाऱ्यांचीही कानउघडणी केली. त्यांनी म्हटलं की लोकांकडून एक पैसाही न घेता, त्यांची कामं झाली पाहिजेत. सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचवणं म्हणजेच सुशासन होय. आता मी खूप डेंजरस फॉर्म मध्ये आहे, त्यामुळं सर्वांनी आपापली जबाबदारी नीट पार पाडा, असंही ते यावेळी म्हणाले.

जाहिरात

कृषी कायदे लवकरच लागू करावीत यावेळी सीएम शिवराज सिंह चौहान यांनी व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली. ते म्हणाले की, तीन कृषी कायदे लवकरात लवकर लागू करण्यात यावेत, मध्य प्रदेशातील 8 कोटी लोकं पंतप्रधान मोदींसोबत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर बसूनच नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात