जिओच्या फ्री आॅफरचा आज शेवटचा दिवस!, 'प्राईम मेंबर'साठी ग्राहकांची झुंबड

रिलायन्स जिओने दिलेल्या फ्री अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंगचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानंतर 31 मार्चपर्यंतच जिओची प्राईम मेंबरशीपची नोंदणी करता येणार आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2017 04:16 PM IST

जिओच्या फ्री आॅफरचा आज शेवटचा दिवस!, 'प्राईम मेंबर'साठी ग्राहकांची झुंबड

31 मार्च :  जिओ ग्राहकांसाठी महत्तवाची बातमी. रिलायन्स जिओने दिलेल्या फ्री अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंगचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानंतर 31 मार्चपर्यंतच जिओची प्राईम मेंबरशीपची नोंदणी करता येणार आहे.

प्राईम मेंबर झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 303 रुपये मोजावे लागतील. यामध्ये तुम्हाला 28 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. पण जिओच्या ग्राहकांना 31 मार्चनंतर प्राईम मेंबर बनता येणार नाही.

याशिवाय जिओने 499 रूपयांचा देखील एक प्लॅन आणला आहे. प्राईम मेंबरशिप यूजर्सला 99 रूपये द्यावे लागणार आहेत. यानंतर 12 महिन्यांसाठी 303 रूपयांचा प्लॅन घेऊन हॅप्पी न्यू इअर ऑफरमध्ये मिळणाऱ्या सुविधांचा पुढील एक वर्षापर्यंत फायदा घेऊ शकतात. मात्र, केवळ डेटा पॅकसाठी पैसे लागणार असून व्हॉईस कॉलिंग सेवा मोफत करण्यात आल्याचं, रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे.

जिओ 1 एप्रिलपासून दर आकारणीला सुरुवात करणार आहे.

दरम्यान, जीओची सुविधा सुरु ठेवण्यासाठी ग्राहकांना 99 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार असल्यानं ग्राहकांनी गर्दी केली आहे.  पण लोकांना अाकर्षित करण्यासाठी इतर नेटवर्क म्हणजेच वोडाफोन आणि एअरटेल या कंपन्या काही हटके ऑफर्स देणार का याची प्रतिक्षा आहे.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 12:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...