मराठी बातम्या /बातम्या /देश /

लालूंचा Come Back: 'आम्ही पोलिओ लसीकरणाचा जगात विक्रम केला होता; मोदी सरकार लोकांना लसही देऊ शकत नाही'

लालूंचा Come Back: 'आम्ही पोलिओ लसीकरणाचा जगात विक्रम केला होता; मोदी सरकार लोकांना लसही देऊ शकत नाही'

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (RJD President Lalu Prasad Yadav) यांनी देशातील कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (RJD President Lalu Prasad Yadav) यांनी देशातील कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (RJD President Lalu Prasad Yadav) यांनी देशातील कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

  • Published by:  News18 Desk

पाटणा (बिहार), 10 मे : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (RJD President Lalu Prasad Yadav) यांनी देशातील कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 1996-1997 सालच्या पोलिओ लसीकरण मोहिमेशी सध्याच्या परिस्थितीची तुलना करत आज सरकार पैसे घेऊनही लोकांना लस उपलब्ध करू शकत नाही हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले.

1996-1997 साली जेव्हा आम्हा समाजवादींच्या नेतृत्वात देशात जनता दलाचं सरकार होतं, त्यावेळी मी राष्ट्रीय अध्यक्ष होतो, तेव्हा आम्ही पोलिओ लसीकरणाचा जागतिक विक्रम केला होता, असं ते म्हणाले. दरम्यान, लालू यादव सध्या नुकतेच जामिनावर तुरूंगातून बाहेर आले आहेत.

त्याकाळात आजसारखी जलद व्यवस्थाही नव्हती आणि लोकांमध्ये जागृतीही नव्हती तरीही आम्ही 07 डिसेंबर 1996 रोजी 11.74 कोटी आणि 18 जनवरी 1997 रोजी 12.73 कोटी बालकांना पोलिओचा डोस दिला होता. हा भारताचा लसीकरणात जागतिक विक्रम होता. त्यावेळी या लसीबाबत लोकांच्या मनात संकोच आणि भरपूर गैरसमज होते, परंतु जनता दलाच्या नेतृत्वातील समाजवादी सरकारने पोलिओ नष्ट करण्याचा निर्धार केला होता.

हे वाचा - सत्ताधारी भाजपच्याच आमदाराला मिळेना बेड; पत्नीला 3 तास जमिनीवरच झोपवलं

आरजेडी सुप्रीमो म्हणाले की, तथाकथित विश्वगुरू सरकार (मोदी सरकार) आपल्या नागरिकांना पैसे देऊनही लस पुरवू शकत नाहीत याची खंत आहे. या प्राणघातक महामारीसाठी लसीकरण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशवासियांना मोफत लस देण्याची मी पंतप्रधानांना विनंती करतो. राज्य आणि केंद्रातील लसींचा खर्च वेगळा असू नये. कारण देश हा राज्यांनीच बनलेला आहे. देशातील प्रत्येक नागरिकास ही लस मिळण्यासाठी केंद्र सरकारनं योग्य पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं पावलं उचलावीत. देशातील सर्वांच मोफत लसीकरण व्हायला हवं.

दरम्यान, चारा घोटाळ्यामध्ये तरुंगात शिक्षा भोगत असलेले नेते लालू प्रसाद यादव सध्या जामिनावर बाहे आले आहेत. ते आता परत राजकारणात सक्रिय होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे.

चारा घोटाळा नेमकं प्रकरण काय ?

चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी आहेत.

हे वाचा - कोरोना काळात नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनियरने सुरू केला भाजी विकण्याचा व्यवसाय,आता होतोय 10 लाख टर्नओव्हर

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.

First published:

Tags: Bihar, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, RJD