कोलकाता : व्यवसायिकाच्या घरी कुबेराचा खजाना निघाल्याने अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. मनी लाँड्रिंग प्रकरणी व्यावसायिकाच्या घरी अवैध रक्कम असल्याची माहिती ED च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी धाड टाकून चौकशी सुरू केली. यावेळी व्यवसायिकाच्या पलंगाखालून ७ कोटी रुपयांची रक्कम मिळाली. हे पाहून अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. रोज हा व्यवसायिक पलंगाखाली एवढे पैसे घेऊन झोपत होता.
मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी इतर ६ ठिकाणीही छापा टाकला. ED च्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तब्बल १७ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. गेमिंग अॅपद्वारे फसवणूक केल्या प्रकरणी या व्यवसायिकाच्या घरी धाड टाकण्यात आली. ६ वेगवेगळ्या ठिकाणाहून १७.३२ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले.
ईडीने शनिवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून कोलकाता शहरातील सहा ठिकाणी शोधमोहीम सुरू केली होती. आमिर खानच्या दुमजली घरातून 15 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर आणखी घबाड सापडलं, एवढे पैसे मोजण्यासाठी जास्तीच्या मशीन अधिकाऱ्यांना मागवाव्या लागल्या. त्यात 500 आणि 2000 च्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या.
#WATCH | Several currency counting machines continue to count crores in cash at businessman Nisar Khan's residence in Kolkata of West Bengal, during ED's raid pic.twitter.com/eVnC6Um7Gh
— ANI (@ANI) September 10, 2022
आमिरसह अनेक लोकांनी मोबाईल गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून अनेक ग्राहकांना फसवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने शनिवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू केली आहे. 15 फेब्रुवारी रोजी पार्क स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये आमिर खानसह अनेक लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolkata, West bengal