दिल्ली, 19 जून : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडात हत्या झाल्याचं समोर आलं आहे. कोलंबिया प्रांतातील सरे शहरात त्याची हत्या करण्यात आली. हरदीप सिंह निज्जरवर एनआयएने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सरे शहरातील गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणाऱ्यासोबत आणखी दोघेजण होते. तपास यंत्रणा हल्लेखोरांचा शोध घेत असून मृत्यू झालेल्याची अधिकृत ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुप्तचर संस्थाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर कॅनडात राहत होता. भारताविरोधात खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम तो करत होता. निज्जर भारतीय तपास यंत्रणांसाठी गेल्या वर्षभरात डोकेदुखी बनला होता. कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मेंबर्सना परदेशात लॉजिस्टिक आणि पैसे देणं सुरू केलं होतं. धक्कादायक! दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा खून, दोघांना अटक काही दिवसांपूर्वी भारत सरकारने हरदीप सिंह निज्जरला दहशतवादी घोषित केलं होतं. निज्जरच्या दोन साथीदारांना फिलिपाइन्स आणि मलेशियातून अटक करण्यात आली होती. हरदीप सिंह निज्जर हा मूळचा जालंधर जिल्ह्यातल्या फिल्लौर इथला आहे. निज्जर बऱ्याच वर्षांपासून कॅनडात राहत होता. भारतात एका मोठ्या हल्ल्याचा कटही तो रचत होता. भारताच्या एकतेला धोका पोहोचवण्यासाठी केल्या जाणाऱ्या हालचालींमध्ये हरदीप सिंह निज्जर सहभागी होता. तो शस्त्र आणि दारुगोळा खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळवणं, भारतात दहशतवादी कारवायांसाठी शीख तरुणांना ट्रेनिंग देत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.