केरळच्या कोझीकोडमध्ये राहणारी जासना सलीम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि त्याचं कारण आहे भगवान श्रीकृष्ण. जासनानं आतापर्यंत श्रीकृष्णाची 500 पेक्षा जास्त चित्रं रेखाटली आहेत. यातील अनेक चित्रांना नागरिकांची पसंती मिळत असून लोक ही चित्रं खरेदी करत आहेत.
सहा वर्षांची असल्यापासून जासना कृष्णाचं चित्र काढते. कृष्णाची प्रतिमा आपल्या मनात आणि मेंदूत पक्की झाल्याचं जासनानं म्हटलं आहे.
आपण सहा वर्षांपासून कृष्णाची विविध चित्रं काढत आहोत आणि असा अनुभव आपण इतर कशाच्याही बाबतीत घेतला नसल्याचं जासनानं म्हटलं आहे.
जासनाला गेल्या वर्षी एका मंदिरात कृष्णाच्या प्रतिमेचं अनावरण करण्याची संधी मिळाली होती. आयुष्यात आपण पहिल्यांदाच मंदिरात गेलो आणि तो अनुभव अद्भुत होता, असं जासनानं म्हटलं आहे.