नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यावर देशद्रोहाचा एका प्रकरणात खटला चालवला जाणार आहे. याबाबत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारने पोलिसांना परवानगी दिली आहे. पोलिसांनी 2016 मधील या प्रकरणात कन्हैय्या कुमारसह उमर खालिद आणि अनिर्वान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. ‘आरोपींनी 9 फेब्रुवारी 2016 ला JNU परिसरात एका कार्यक्रमादरम्यान मोर्चा काढला होता. त्यावेळी तिथं देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांचं कन्हैय्या कुमार आणि इतर आरोपींनी समर्थन केलं होतं,’ असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे.
JNU sedition matter: Prosecution Department of Delhi government has given its approval for a trial in the matter. Former JNU Students Union President Kanhaiya Kumar and others are involved in the matter. pic.twitter.com/A9OGNwKTSj
— ANI (@ANI) February 28, 2020
कन्हैय्या कुमारवर 2016 मध्ये JNU परिसरात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणा आणि समाजात द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली वर्षभरापूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. यावेळी कन्हैय्यावर देशद्रोहासह इतरही काही कलमे लावण्यात आली होती. ‘या’ लोकांना करण्यात आलं साक्षीदार याप्रकरणी सर्व काश्मिरी विद्यार्थींची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात आरोपपत्रात 124A (देशद्रोह), 323, 465, 471, 143, 149, 147, 120B यांसारखी कलमं लावण्यात आली आहेत. याप्रकरणी स्पेशल सेलने दिल्लीचे पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली होती. तसंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि जेएनयूमधील सुरक्षारक्षकांना साक्षीदार बनवण्यात आलं आहे.