मराठी बातम्या /बातम्या /देश /

क्षुल्लक गोष्टी मोठ्या करणाऱ्या पत्नीला हायकोर्टाचा दणका, पती आणि सासूची निर्दोष मुक्तता

क्षुल्लक गोष्टी मोठ्या करणाऱ्या पत्नीला हायकोर्टाचा दणका, पती आणि सासूची निर्दोष मुक्तता

तक्रारदार पत्नी छोट्या गोष्टी मोठ्या करून प्रकरण वाढवत असल्याचं म्हणत कोर्टाने तिची याचिका फेटाळली आहे.

तक्रारदार पत्नी छोट्या गोष्टी मोठ्या करून प्रकरण वाढवत असल्याचं म्हणत कोर्टाने तिची याचिका फेटाळली आहे.

तक्रारदार पत्नी छोट्या गोष्टी मोठ्या करून प्रकरण वाढवत असल्याचं म्हणत कोर्टाने तिची याचिका फेटाळली आहे.

    मुंबई, 19 ऑगस्ट: पती आणि पत्नीमध्ये अनेक कारणांवरून वाद होत असतात. काही वाद घरातच सोडवले जातात, पण काही वाद नाही सोडवता आले तर प्रकरण कोर्टापर्यंत जातं. असंच एक प्रकरण कोर्टात पोहोचलं आणि तक्रारदार पत्नी छोट्या गोष्टी मोठ्या करून प्रकरण वाढवत असल्याचं म्हणत कोर्टाने तिचा अमेरिकेत स्थायिक असलेला पती आणि सासूची निर्दोष मुक्तता केली आहे. 'तक्रारदार पत्नी अतिशय संवेदनशील असल्याने घरातल्या क्षुल्लक, छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगत असल्याचं दिसून येतंय आणि त्याचाच परिणाम सध्याच्या प्रकरणात झाला आहे,' असं निरीक्षण नोंदवत कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) तिचे पती आणि  त्याच्या 77 वर्षीय वृद्ध आईची निर्दोष मुक्तता केली आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलंय. काय आहे प्रकरण? 'पतीनं अमेरिकेत (US) नोकरी मिळवण्यासाठी तिला खूप अभ्यास करण्यास सांगितलं. याशिवाय तिची सासू तिला मूल होण्यासाठी, जास्त खाण्यासाठी त्रास देत होती आणि तामिळ भाषा (Tamil language) शिकण्यासाठी दबाव टाकत होती, असा आरोप तक्रारदार महिलेनं केला होता. त्यानंतर या प्रकरणात सप्टेंबर 2013 मध्ये बेंगळुरू येथील न्याय दंडाधिकाऱ्यांनी (magistrate court in Bengaluru) डॉक्टर पती आणि त्याच्या आईला दोषी ठरवलं होतं. डॉक्टर आणि त्याच्या आईला दंडाधिकारी न्यायालयाने आयपीसीच्या कलम 498-ए (क्रूरता) आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या (Dowry Prohibition Act) कलम 3 आणि 4 अंतर्गत दोषी ठरवलं. तसंच मुलाला 1 लाख रुपये दंडासह एक वर्षाची साधी कैद (simple imprisonment) तर आईला 10 हजार रुपये दंडासह सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. 1 डिसेंबर 2016 रोजी, 51 व्या शहर दीवाणी (city civil) आणि सत्र न्यायालयाने (sessions court) ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला दुजोरा दिला होता. या दोन्ही निकालांना फौजदारी पुनर्विचार याचिकांद्वारे डॉक्टरने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. डॉक्टर आणि त्याच्या आईने दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. बी. प्रभाकर शास्त्री (Justice HB Prabhakara Sastry) यांच्या समोर झाली. या वेळी तक्रारदाराने दिलेल्या जबानीमध्ये वहावत जाऊन ट्रायल कोर्ट आणि सेशन्स कोर्टातील न्यायाधीशांनी मुख्य घडलेल्या घटनेतील तथ्यांकडे दुर्लक्ष केलं, असं निरीक्षण न्यायमूर्ती एचबी प्रभाकर शास्त्री यांनी नोंदवलं. तसंच तक्रारदार आणि साक्षीदार यांनी दिलेल्या स्टेटमेंट्समध्ये तथ्यांश काहीच नाही, असंही शास्त्री म्हणाले. 'महिला एससी आहे, तिला कोण स्पर्श करेल', केरळ कोर्टाचा अजब तर्क, आरोपीला जामीन मंजूर पत्नीने दावा केला होता की तिच्या माहेरच्या व्यक्तींशी तिला संपर्क साधू दिला जात नव्हता. तरीही ती आपल्या लहान बहिणीशी ई-मेल्सच्या माध्यमातून बोलत होती. अशावेळी तिची बहीण ही मुख्य साक्षीदार असू शकते, पण तिची साक्ष कोर्टात नोंदवण्यात आली नाही, याकडे शास्त्री यांनी आपल्या निकालात लक्ष वेधलं. सासू चांगलं जेवायला देत होती, असं तक्रारदार पत्नीने आपल्या बहिणीला पाठवलेल्या ई-मेल्समध्ये म्हटलं होतं. दुसरीकडे तिला उपाशी ठेवण्यात येतंय, असं ती म्हणत होती. या दोन्हींमध्ये विरोधाभास आहे. तसेच ती पारंपरिक कुटुंबात (traditional family) राहत असूनही पूजा करण्यास तयार नव्हती, यावरून तिची विचारसरणी दिसून येते, असं न्यायाधीश शास्त्रींनी नमूद केलं. तसंच मुलगा अमेरिकेत स्थिर होईपर्यंत त्यांनी मुलाला जन्म देऊ नये अशी त्याच्या आईची इच्छा होती.पण हा मुद्दा हा पूर्णपणे आई आणि मुलगा यांच्यातील होता, असंही न्यायमूर्ती म्हणाले. 11 ऑगस्ट 2008 रोजी तक्रारदार महिलेने तिच्या बहिणीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलंय की, तिची सासू तिला खूप जास्त जेवायला देत आहे आणि ते तिला खावं लागतंय. नाही खाल्लं तर तिला जेवण मिळणार नाही. त्याचवेळी तक्रारकर्त्या महिलेने असंही म्हटलंय की तिची सासू तिच्याशी दररोज भांडते आणि तिला नीट खाता आणि श्वास घेताही येत नाही. प्रेम आणि आपुलकीच्या प्रत्येक सकारात्मक कृतीला या महिलेने वेगळा रंग दिला आहे. प्रेम आणि आपुलकीला छळ असल्याचं सांगत ती लोकांना चुकीचं भासवण्याचं काम करते आहे,” असं न्यायाधीश शास्त्री यांनी पुढे नमूद केलंय. 'या' कारणामुळे लाखो सबस्क्राइबर्स असलेल्या 8 YouTube न्यूज चॅनेलवर बंदी 'कुटुंब हा चांगल्या समाजातील एक महत्वाचा घटक आहे, हे तक्रारदार आणि तिचा पती विसरले आहेत. बहुतेक कुटुंबांमध्ये लहान आणि किरकोळ आवडीनिवडी आणि नापसंती यावरून मतभेद सामान्य असतात. पण या प्रकरणातील तक्रारदार महिला अनेक क्षुल्लक गोष्टींना मोठं करून कांगावा करत असल्याचं दिसून येतंय. याचाच परिणाम सध्याच्या प्रकरणात झाला आहे,' असं न्यायाधीशांनी या प्रकरणात स्पष्ट केले.
    First published:

    Tags: High Court, Karnataka, Marriage

    पुढील बातम्या