बंगळुरू, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस बहुमताच्या जवळ पोहोचले आहे तर भाजपही 90 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. हीच स्थिती कायम राहिली तर राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल. कर्नाटकात काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर या खानापूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्या काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भाची आहेत. खानापूर मतदारसंघ हा महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला मानला जातो. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अपक्ष उमेदवार उभा केला गेलाय. १९५७ पासून महाराष्ट्र एकीकरण समितीने या ठिकाणी विजय मिळवला आहे. 2008 आणि 2018 मध्ये त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. 2008 मध्ये भाजप उमेदवाराने तर 2018 मध्ये काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांनी ही जागा जिंकली होती. Karnataka Election result Live Updates : कर्नाटक निवडणूक निकालाचे लेटेस्ट अपडेट वाचा एका क्लिकवर काँग्रेसच्या आमदार अंजली निंबाळकर यावेळी पुन्हा जिंकतील असं चित्र दिसत आहे. 2018 मध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा पराभव केला होता. जेडीएसचे नसीर बापुसाहेब भगवान हेसुद्धा लढत आहेत. अंजली निंबाळकर यांनी 2018 मध्ये 5 हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. राज्यात भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या पण त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.