• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कडकनाथ कोंबडी सर्दीवर जालीम उपाय, मागणीत तुफान वाढ; 10,000 पर्यंत वेटिंग

कडकनाथ कोंबडी सर्दीवर जालीम उपाय, मागणीत तुफान वाढ; 10,000 पर्यंत वेटिंग

कोंबड्यांची मागणी पाच पटीने वाढली आहे. त्यामुळे ते नागरिकांची मागणी पूर्ण करू शकत नाही

 • Share this:
  भोपाळ, 20 नोव्हेंबर : ग्वाल्हेरच्या कृषी विज्ञान केंद्रातील कडकनाथच्या कोंबड्यांची (Kadaknath Chicken) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कृषी विज्ञान केंद्रात कडकनाथ कोंबड्यांची मागणी पाच पटीने वाढली आहे. त्यामुळे ते नागरिकांची मागणी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे केंद्रात कडकनाथच्या कोंबड्यांसाठी 10 हजारापर्यंत वेटिंग आहे. थंडीत कडकनाथच्या कोंबड्यांना मागणी.. थंडी वाढताच संपूर्ण देशभरातून कडकनाथ कोंबड्यांची मागणी वाढते. थंडीच्या दिवसात ही मागणी 4 ते 5 पटीने वाढते. कारण कडकनाथच्या कोंबड्या उष्ण असतात आणि थंडीमध्ये शरीरासाठी कडकनाथ फायदेशीर असतात. ग्वाल्हेर कृषी विज्ञान केंद्रासह विविध राज्यांमध्येही कडकनाथच्या कोंबड्यांची मागणी वाढते. यामुळे केंद्रातून ही मागणी पूर्ण करण्यास अडथळा येत आहे. देश का तीसरा कड़कनाथ सेंटर  सांगितलं जात आहे की, ग्वाल्हेर कृषी विज्ञान केंद्र देशातील तिसरं असं केंद्र आहे जेथे कोंबड्यांची हेचिंग केली जाते. म्हणजे कडकनाथच्या अंड्यांमधून पिल्ल तयार केली जातात आणि त्याची विक्री केली जाते. येथे तयार केलेली पिल्ल देशातील विविध भागांमध्ये सप्लाय केली जातात. विशेषत: थंडीच्या दिवसात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि हैद्राबाद राज्यांमध्ये कडकनाथच्या मागणीत वाढ होते. सातत्याने उत्पादनात वाढ.. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधक डॉ, राजसिंह कुशवाह यांनी सांगितलं की, ग्वाल्हेरच्या कृषी विज्ञान केंद्रात 2016 मध्ये कडकनाथचं उत्पादन सुरू झालं होतं. हे ही वाचा-देशाची राजधानी अजूनही Air Pollution च्या विळख्यात, आजही वाईट हवा कडकनाथमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन.. मिळालेल्या माहितीनुसार, कडकनाथ जातीच्या कोंबड्या सर्वसामान्य कोंबड्यांपेक्षा चांगलं मेडिकेशन मूल्य असतं. कडकनाथमध्ये प्रोटीन तत्व 25 टक्के, फॅट 0.73 ते 1.03 टक्के असतं. यासोबत लिनोलिक अॅसिड 24 टक्के आणि कॅस्ट्रॉल 184 मिलीग्रॅम असतं. कडकनाथच्या चिकनमध्ये प्रोटीन कोंबड्यांमध्ये अन्य कोंबड्यांपेक्षा जास्त फॅट आणि कॅस्ट्रोल कमी असतं. चांगस्या मेडिसिनल वॅल्यूमुळे यामुळे आजारही होत नाही. कडकनाथ कोंबड्याच्या रक्ताचा रंग काळ्या रंगाचा असतो. याशिवाय मास आणि हाडंही काळे असतात. कडकनाथचं मांस थंडीत फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: