Home /News /national /

जुही चावला 5G प्रकरणात नवा ट्विस्ट, सुनावणी करणारे न्यायाधीशच खटल्यातून बाहेर, दिलं ‘हे’ कारण

जुही चावला 5G प्रकरणात नवा ट्विस्ट, सुनावणी करणारे न्यायाधीशच खटल्यातून बाहेर, दिलं ‘हे’ कारण

जुही चावलानं दिल्ली उच्च न्यायालयात 5G विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरून देशभर चर्चा सुरू असतानाच या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांनी या केसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

     नवी दिल्ली, 12 जुलै: जुही चावलानं (Juhi Chawla) दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi high court) 5G विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरून देशभर चर्चा सुरू असतानाच या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्या. संजीव नरुला यांनी (Justice Sanjeev Narula) या केसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात 20 लाख रुपयांचा (20 Lakh fine) दंड जुही चावलाला ठोठावण्यात आला होता. त्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान आता न्यायाधीशांनी या केसमधून बाहेर पडण्याचा निर्णय़ घेतल्यामुळे आता नव्या न्यायाधीशांसमोर पुन्हा याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. काय होतं प्रकरण देशात येऊ घातलेल्या 5G नेटवर्कमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणाच्या संतुलनावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी याचिका अभिनेत्री जुही चावलानं दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र ही याचिका खोडसाळ असून कोर्टाचा वेळ वाया घालवल्याप्रकऱणी न्यायाधीशांनी जुही चावलला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जुहीनं पुन्हा दाद मागितली होती. त्यावर सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच या प्रकरणातील न्यायाधीशांनी खटल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काय म्हणाले न्यायाधीश? अशा याचिकांमुळे आपण हतबुद्ध झालो आहोत, असं न्या. संजीव नरुला यांनी म्हटलं आहे. न्यायालयानं लावलेला दंड योग्यच असून या प्रकरणात न्यायालयाचा अवमान झाल्याची नोटीसही पाठवता आली असती. मात्र न्यायालयानं मनाचा मोठेपणा आणि औदार्य दाखवत तसं केलं नाही, हे जुही चावलानं समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा त्याचा वेगळा खटला चालवावा लागला असता. या प्रकरणामुळं आपलं बैचेन असून या खटल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय आपण घेत आहोत, असं न्या. नरुला यांनी म्हटलं आहे. जुही निर्णयावर ठाम जुही चावलानं ही याचिका केवळ सवंग प्रसिद्धीसाठी दाखल केली होती, असा निर्वाळा देत न्यायालयानं 4 जूनला ती फेटाळून लावली होती. जुही चावलाला 20 लाख रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर त्यावर प्रतिक्रिया देताना जुही चावलानं आपला लढा सुरूच राहणार असल्याचं म्हटलं होतं. दूरसंचार विभागाच्या सगळ्या योजना प्रत्यक्षात पूर्ण झाल्या, तर पृथ्वीवरील सर्व माणसं, प्राणी, पक्षी आणि किटकांवरही त्याचा दुष्परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया जुही चावलानं दिली होती.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Delhi high court, Telecom companies

    पुढील बातम्या