मराठी बातम्या /बातम्या /देश /

15 एप्रिलपर्यंत होता येणार'जिओ'चं मेंबर,'या' प्लॅनने मिळेल 3 महिने मोफत डेटा

15 एप्रिलपर्यंत होता येणार'जिओ'चं मेंबर,'या' प्लॅनने मिळेल 3 महिने मोफत डेटा

31 मार्च : मोबाईल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या जिओने आज आणखी एक मोठी घोषणा केलीये. जिओ प्राईम मेंबरशिपला वाढता प्रतिसाद पाहता आजची डेडलाईन 15 दिवसांनी पुढे ढकली आहे. त्यासोबतच 'जिओ समर सरप्राईज' प्लॅनची घोषणा केली असून यामध्ये 3 महिने मोफत डाटा मिळणार आहे.

रिलायन्स जिओ आता हे नावाचं पुरेसं झालंय. रिलायन्स जिओ लाँच झालं तेव्हा सर्वांना मोफत सेवा दिली. आज 31 मार्च रोजी या मोफत सेवेचा अखेरचा दिवस होता. सर्वत्र जिओ मेंबरशिप घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालीये. आतापर्यंत जिओ प्राईम मेंबरशिपसाठी 7.2 कोटी ग्राहक जोडले गेले आहे. वाढता प्रतिसाद पाहता रिलायन्सने ग्राहकांना आणखी वेळ देत 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलीये. प्राईम मेंबरचा टेरिफ प्लॅन जुलैपासून लागू होणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलंय की, जिओचे प्राईम डाटा प्लॅन ग्राहकांना सर्वात चांगले आणि फायदेशीर राहतील. तसंच 15 एप्रिलपर्यंत रिचार्ज केलं नाही तर सर्व्हिस बंद होईल असंही त्यांनी सांगितलं.

जिओने आपल्या प्राईम मेंबरसाठी 'जिओ समर सरप्राईज' प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये 15 एप्रिलपर्यंत 303 किंवा त्यापेक्षा जास्तचा प्लॅन रिचार्ज केला तर त्यांनी पुढील 3 महिने मोफत डाटा वापरता येणार आहे. पण, तीन महिन्यानंतर हा प्लॅन बंद होईल आणि तुम्हाला रिचार्जसाठी पैसे मोजावे लागणार आहे.

First published:

Tags: Relince