जाहिरात
मराठी बातम्या / देश / Ropeway Accident: 20 तासांपासून हवेत लटकताहेत 48 जण; ड्रोननं अन्नपाण्याचा पुरवठा, बचावकार्यात अडथळे

Ropeway Accident: 20 तासांपासून हवेत लटकताहेत 48 जण; ड्रोननं अन्नपाण्याचा पुरवठा, बचावकार्यात अडथळे

Ropeway Accident: 20 तासांपासून हवेत लटकताहेत 48 जण; ड्रोननं अन्नपाण्याचा पुरवठा, बचावकार्यात अडथळे

झारखंडच्या (Jharkhand) सर्वात उंच रोप वेवर (Ropeway Accident) झालेल्या अपघातात अजूनही 48 लोक अडकले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

झारखंड, 11 एप्रिल: झारखंडच्या (Jharkhand) सर्वात उंच रोप वेवर (Ropeway Accident) झालेल्या अपघातात अजूनही 48 लोक अडकले आहेत. रविवारी संध्याकाळी पाच वाजता त्रिकूट रोपवे ट्रॉली एकमेकांवर आदळली. त्यामुळे लोक टेकडीवर अडकून पडले. एनडीआरएफने (NDRF) रात्री उशिरापासूनच बचावकार्य सुरू केलं. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आलं, मात्र आतापर्यंत लोकांना सुखरूप परत आणता आलेलं नाही. (Jharkhand’s highest ropeway accident) रविवारी रामनवमीनिमित्त शेकडो पर्यटक येथे पूजा करण्यासाठी दाखल झाले होते. रोपवेची एक ट्रॉली खाली येत होती, जी वर जाणाऱ्या ट्रॉलीला धडकली. या अपघातात ट्रॉलीमधील लोक जखमी झाले. हा अपघात झाला त्यावेळी सुमारे दोन डझन ट्रॉल्या हवेत होत्या. घाईघाईत अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान अपघात होऊन 20 तास उलटले तरी 48 जण अजूनही हवेत लटकले आहेत. येथे 18 ट्रॉली आहेत. या लोकांना वाचवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचताच हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे 18 ट्रॉली हलू लागल्या आहेत आणि त्यामध्ये असलेल्या लोकांच्या जीवावर बेतताना दिसत आहे. ड्रोनद्वारे अन्न आणि पाण्याचा पुरवठा रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तासाभराच्या प्रयत्नानंतरही बचाव पथकाला यश मिळालेले नाही. हेलिकॉप्टरद्वारे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वर अडकलेल्या लोकांना ड्रोनद्वारे अन्न आणि पाणी दिले जात आहे. ट्रॉलीमध्ये लहान मुले, पुरुष आणि काही महिला अडकल्या आहेत. यासोबतच गाईड आणि फोटोग्राफरही अडकले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी मंजुनाथ भैजंत्र म्हणाले, सध्या रोपवे बंद आहे, ट्रॉली डिस्प्लेस झाल्यानं हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी NDRF सह लष्कराची मदत घेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये. अनेक जखमी, एकाचा मृत्यू या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे हे लष्करासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. अपघात कसा झाला? रोपवेची तीन ट्रॉली डिस्प्लेस आणि एकमेकांवर आदळल्याने वरील ट्रॉलीही हलू लागल्या. त्यामुळे ते दगडांवरआदळले, त्यामुळे हा अपघात झाला. याठिकाणी जखमींना देवघर सदर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: jharkhand
  • First Published :
जाहिरात
जाहिरात