जाहिरात
मराठी बातम्या / देश / Women’s Day ला महिला आमदाराचा अनोखा अंदाज; घोडेस्वारी करत पोहोचल्या विधानसभेत,VIDEO

Women’s Day ला महिला आमदाराचा अनोखा अंदाज; घोडेस्वारी करत पोहोचल्या विधानसभेत,VIDEO

amba prasad

amba prasad

आज जगभरात महिला दिन (Women’s day) साजरा केला जातोय. सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करत आहेत. आज महिला दिनानिमित्त झारखंडच्या काँग्रेस आमदार अंबा प्रसाद (Jharkhand congress MLA Amba prasad) चर्चेत आल्या आहेत.

    नवी दिल्ली, 8 मार्च:  आज जगभरात महिला दिन (Women’s day) साजरा केला जातोय. सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करत आहेत. आज महिला दिनानिमित्त झारखंडच्या काँग्रेस आमदार अंबा प्रसाद (Jharkhand congress MLA Amba prasad) चर्चेत आल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे त्या घोड्यावर स्वार (Riding horse) होऊन विधानसभेत दाखल झाल्या. अंबा प्रसाद यांचा घोडेस्वारी करत विधानसभेत जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (video viral on social media) चांगलाच व्हायरल होत आहे. अंबा प्रसाद यांनी घोडेस्वारी करताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “फक्त आजचाच नाही तर रोजचाच दिवस आमचा महिलांचा असतो. आज महिला दिनाचं औचित्य साधत मी घोडस्वारी करण्याचा निर्णय घेतला कारण समाजाच्या विचारसरणीत बदल व्हावा असं मला वाटतं. सर्वच क्षेत्रांत महिलांची भागीदारी वाढावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना खूप शिकवावं, महिलांचं योगदान सर्वच क्षेत्रांत वाढावं, यासाठी पालकांनी त्यांना शिक्षण द्यावं.” तसंच घोडेस्वारी आपल्याला खूप आवडते, असंही अंबा प्रसाद म्हणाल्या.

    जाहिरात

    “प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा, झाशीची राणी आहे, महिलांनी प्रत्येक आव्हानाला सामर्थ्याने सामोरं जावं. महिला प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत असल्याने पालकांनी आपल्या मुलींना शिक्षण दिले पाहिजे,” असंही अंबा प्रसाद म्हणाल्या. कोण आहेत आमदार अंबा प्रसाद? अंबा प्रसाद या बरकागाव येथील माजी आमदार निर्मला देवी आणि योगेंद्र साओ यांची मुलगी आहे. त्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बरकागाव मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या. त्या निवडून आल्या तेव्हा त्या केवळ 28 वर्षांच्या होत्या. अंबा प्रसाद या झारखंडमधील सर्वांत तरुण महिला (Youngest Female MLA) आमदार आहेत. त्यांचे वडील साओ हे माजी मंत्री असून, ते झारखंडच्या मंत्रिमंडळाचा भाग होते.

    अंबा यांनी एमबीए (MBA) आणि एलएलबीमध्ये (LLB) शिक्षण पूर्ण केलंय. त्यांना घोडेस्वारी प्रचंड आवडते आणि झारखंडमध्ये घोडेस्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, अंबा प्रसाद यांनी घोडेस्वारी करत विधानसभेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी महिला दिनाच्या दिवशी त्या घोडेस्वारी करत विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांची चांगलीच चर्चा झाली होती. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कर्नल रवी राठौड यांनी घोडा भेट म्हणून दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात