नवी दिल्ली, 23 डिसेंबर: झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 81 जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सुरुवातीला पोस्टल आणि नंतर एव्हीएमद्वारे मतमोजणी करण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली असून दुसऱ्यांचा सत्ता मिळते की काँग्रेस बाजी मारते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये सभा घेत जोरदार प्रचार केला होता. तर काँग्रेसनेही पुनरागमन करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. महाराष्ट्रात भाजपला फटका बसल्यानंतर झारखंडमध्ये काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







