जाहिरात
मराठी बातम्या / देश / मैत्री, प्रेम, शारिरीक संबंध, लग्नाला नकार आणि मग...प्रेमकरणात शेवटी पोलिसांची एन्ट्री

मैत्री, प्रेम, शारिरीक संबंध, लग्नाला नकार आणि मग...प्रेमकरणात शेवटी पोलिसांची एन्ट्री

तरुण आणि तरुणी

तरुण आणि तरुणी

एका प्रेमप्रकरणाच्या संबंधांची सर्वत्र चर्चा होत आहे.

  • -MIN READ Local18 Jhansi,Uttar Pradesh
  • Last Updated :

शाश्वत सिंह झाशी, 12 जुलै : काही घटना अगदी चित्रपटाच्या कथेसारख्या असतात. अशीच एक घटना उत्तरप्रदेश राज्यातील झाशी येथून समोर आली आहे. या घटनेमध्ये मैत्री, प्रेम, भांडण, पोलीस ठाणे आणि मग लग्न हा सर्व प्रकार पाहायला मिळाला. प्रेमसंबंधाच्या या प्रकरणाची संपूर्ण परिसरात एकच चर्चा होत आहे. झाशी शहरातील गौरव नावाच्या एका तरुणाची काही दिवसांपूर्वी रश्मी नावाच्या एका तरुणीशी मैत्री झाली होती. दोघांमध्ये झालेल्या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. विशेष म्हणजे रश्मी ही गौरवच्या शहरापासून 60 किमी दूर राहते. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर ते दोन्ही खूपच जवळ आले. इतके की, गौरव आणि रश्मी यांनी ओरछा येथील एका मंदिरात आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन एकमेकांना दिले.

News18लोकमत
News18लोकमत

यानंतर गौरव हा नेहमी रश्मीला भेटायला मऊरानीपूर जायला लागला. पण रश्मि गर्भवती झाली आहे, असे दोन महिन्यांनी समोर आले. यानंतर रश्मिने कोर्ट मॅरेज करण्याची मागणी केली तर गौरवची तारांबळ उडाली. त्याचे वागण्याचे स्वरुप बदलले हा प्रकार पाहून रश्मिला मोठा धक्का बसला. ती गौरवच्या संपर्कात तशीच राहिली. काही दिवसांपूर्वी रश्मिने गौरवला भेटण्यासाठी मौरानीपूर येथे बोलावले. गौरव तिथे पोहोचल्यावर रश्मीने लग्नाचा विषय काढला. यावेळी गौरवने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता रश्मीने पोलिसांना बोलावले. तसेच रश्मी गौरवशी लग्न करण्यावर ठाम राहिली. यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी तुलसीराम पांडे यांनी समजवल्यावर दोन्हीही जण लग्नासाठी तयार झाले. यानंतर त्यांनी याठिकाणी एका मंदिरात लग्न केले. तुलसीराम पांडे यांनी सांगितले की, हे प्रकरण समोर आल्यानंतर दोघांशी चर्चा करण्यात आली आणि त्यांना समजवण्यात आले. दोन्ही तरुण तरुणी बालिक असून त्यांनी स्वत:च्या इच्छेने लग्न केले आहे. प्रेमसंबंधाच्या या प्रकरणाची संपूर्ण परिसरात एकच चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात