श्रीनगर, 12 जून : जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा हल्याच्या जखमा भरत नाही तोच CRPF जवानांवर अतिरेक्यांनी पुन्हा हल्ला केलाय. हा आत्मघातकी हल्ला असून यात 5 जवान शहीद झाले आहेत. 2 जवान जखमी झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. अनंतनाग जवळच्या के.पी रोडवर हा हल्ला झाला. सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा आत्मघाती हल्ला आहे. पेट्रोलिंगसाठी जवानांचं वाहन जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला.
हल्ल्यानंतर जावानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यात दोन दहशतवादी ठार झाले. जखमी जवानांना अनंतनागच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय. सर्व परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोध मोहिमही राबविण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुलमावा इथे 14 फेब्रुवारीला CRPF जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते.
#UPDATE Total 5 CRPF personnel have lost their lives in Anantnag terrorist attack in Jammu & Kashmir, today. pic.twitter.com/sXoVnbkqzi
— ANI (@ANI) June 12, 2019
Jammu and Kashmir: Terrorists attack police party at KP road in Anantnag; heavy firing underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/Flm1X42FdR
— ANI (@ANI) June 12, 2019
18 महिन्यांमध्ये 357 अतिरेक्यांचा खात्मा
जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये तब्बल 357 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. गेल्या सहा महिन्यांममध्ये पाकिस्तानने 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहिम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहिम सुरू आहे.
'ऑपरेशन ऑल आऊट'
'ऑपरेशन ऑल आऊट' असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची ही मोहिम सुरू आहे. याच कारवाईत 20 जणांना अटकही करण्यात आली असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळी आहे.
या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते. हे दहशतवादी काही घातपात घडविण्याच्या आधीच त्यांना संपवलं जातं. त्यांनी घातपात घडविल्यावर शोध घेण्यापेक्षा आधीच आक्रमक धोरण स्वीकारलं तर मोठी हानी टाळली जाते असं लष्कराचं मत आहे. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना लष्कराने कारवाई करत महिनाभरातच यमसदनी पाठवलं होतं. लष्कर ही यादी सातत्याने अपडेटही करत असते.