श्रीनगर, 05 एप्रिल: काश्मीरमध्ये (Kashmir) दहशतवाद्यांच्या (Terrorism) कुरापती काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. गेल्या 24 तासांत दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि सर्वसामान्य नागरिकांना (security forces and civilians) लक्ष्य करत चार मोठे हल्ले केले आहेत. काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley)गेल्या 24 तासात 4 वेगवेगळ्या दहशतवादी हल्ले (Terror Attack) झाले ज्यात 1 जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला. अन्य हल्ल्यांमध्ये 1 काश्मिरी पंडित आणि 4 मजूर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दोन, शोपियान जिल्ह्यात एक आणि श्रीनगरमध्ये एक हल्ले केले. सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी शोपियानच्या छोटीगाम (Shopian’s Chhotigam village)गावात औषध विक्रेत्या काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादी (terrorists) घटनास्थळावरून पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील छोटीगाम गावात औषध विक्रेता बाल कृष्ण उर्फ सोनू कुमार बालाजी यांच्यावर सोमवारी संध्याकाळी उशिरा दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर लगेचच पोलीस आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. गेल्या 24 तासांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेला हा चौथा हल्ला आहे, तर आज दिवसभरात एकूण तीन दहशतवादी हल्ले झाले आहेत. यापूर्वी तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये बिगर काश्मिरी कामगार आणि काश्मिरी व्यावसायिकांना लक्ष्य करण्यात आलं होतं. पुलवामा येथे सोमवारी दुपारी दोन गैर-स्थानिक कामगारांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही कामगार जखमी झाले. त्यांची ओळख बिहारचे रहिवासी पातालश्वर कुमार यांचा मुलगा जोको चौधरी आणि जोको चौधरी यांचा मुलगा थौग चौधरी अशी आहे. रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिमाचलचा ट्रक चालक आणि त्याचा सहाय्यक जखमी झाला. सुरेंद्र सिंग यांचा मुलगा बिशन सिंग आणि डेप्युटी ड्रायव्हर धीरज दत्त यांचा मुलगा सुशील दत्त अशी त्यांची नावं असून दोघेही हिमाचल प्रदेशातील नूरपूर कांगडा येथील रहिवासी आहेत. आता दहशतवाद्यांनी बाहेरील राज्यातील लोकं आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.