श्रीनगर, 19 डिसेंबर: श्रीनगरमधील (Srinagar) हरवान भागात सुरक्षा दल (security forces)आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) एक दहशतवादी मारला गेला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीवरून, पोलीस (Police) आणि सीआरपीएफच्या (CRPF) संयुक्त पथकाने हरवान परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. ठार झालेला दहशतवादी परदेशी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र, ठार झालेल्या दहशतवाद्याची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. एका इनपुटच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली होती. आज पहाटे चकमक सुरू झाली आणि काही वेळातच सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. सुरक्षा दल मारला गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचयी सुरुवात केली आणि त्याचवेळी परिसरात सतर्कता ठेवली जात होती.
J&K | Encounter breaks out between security forces and terrorists at Harwan area of Srinagar: Kashmir Zone Police Details awaited.
— ANI (@ANI) December 18, 2021
काही दिवसांपूर्वी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन मॅगझिन, पिस्तुलच्या सात राऊंड, एक ग्रेनेड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. या आधारे तत्काळ कारवाई करत, एसओजीने लष्कराच्या एका राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या 188 बटालियनसह परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली.
मारले गेलेले दहशतवादी अनेक घटनांमध्ये होते सामील
पोलिसांनी सांगितलं की, कुज्जर फ्रिसाल येथील अमीर बशीर दार आणि सुरसानो हातीपोरा येथील आदिल युसूफ अशी या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, लष्कराचे दोन्ही दहशतवादी सुरक्षा दलांवर हल्ले आणि स्थानिक लोकांवरील अत्याचारांसह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते.
सुरक्षा दलांना मोठे यश : IG
आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेल्याबद्दल आणि व्यावसायिक पद्धतीने ऑपरेशन पार पाडल्याबद्दल सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या कारवाईत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.