Pulwama Encounter: सुरक्षा दलांनी केला आणखी 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Pulwama Encounter: सुरक्षा दलांनी केला आणखी 2 दहशतवाद्यांचा खात्मा

2 Terrorists killed in Encounter in Pulwama: सुरक्षा दलाने या भागात सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जवानांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

  • Share this:

पुलवामा 06 नोव्हेंबर: जम्मू कश्मीर (Jammu Kashmir) मध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेली धडक मोहिम कायम आहे, शुक्रवारी पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातल्या पंपोर इथं झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केलं. पंपोर इथं दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या भागाला वेढा दिला होता.

सुरक्षा दलाने या भागात सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जवानांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. काही तासांच्या चकमकीनंतर 2 दहशतवादी मारले गेले. तर एकाने शरणागती पत्करली. या कारवाईत एका नागरिकाचाही मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

या दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचं काम सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधलं (jammu and Kashmir) वादग्रस्त 370 कलम(Article 370) हटवल्यानंतर सुरक्षा दलं आक्रमक झाली आहे. वर्षभरापूर्वी 5 ऑगस्ट 2019ला हे कलम हटविण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यात कशी परिस्थिती असेल अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र काही महिन्यांचा अपवाद वगळता राज्यात शांतता निर्माण करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय.

तर दहशतवाद्यांविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका घेतली असून गेल्या 11 महिन्यांमध्ये केलेल्या कारवाईत तब्बल 200 दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी रविवारी दिली.

पती आणि मुलासह सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला; 1000 फूट दरीत सापडला मृतदेह

रविवारी (01 नोव्हेंबर) झालेल्या चकमकीत हिज्जबुल मुदाहीद्दीनचा नंबर वन कमांडर डॉ. सैफुल्ला हा मारला गेला. तो ऑक्टोबर 2014पासून राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. दहशतवाद्यांचा मारला गेलेला पोस्टर बॉय बुऱ्हाण वाणी याच्यासोबतही त्याने काम केलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून सुरक्ष दलं सैफुल्लाच्या मागावर होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 6, 2020, 8:31 PM IST

ताज्या बातम्या