• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Jammu and Kashmir: जम्मू विमानतळावर 5 मिनिटात दोन स्फोट, विमानतळ परिसर सील

Jammu and Kashmir: जम्मू विमानतळावर 5 मिनिटात दोन स्फोट, विमानतळ परिसर सील

Jammu and Kashmir Explosion: जम्मू (Jammu airport) विमानतळावर स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घ्या अपडेट्स.

 • Share this:
  श्रीनगर, 27 जून: जम्मू (Jammu airport) विमानतळावर स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानतळाच्या टेक्निकल एरियामध्ये हा (Explosion)स्फोट झाला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम (Forensic Team)घटनास्थळी दाखल झाली आहे. एनआयए या वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.घटनास्थळी दाखल होऊन फॉरेन्सिक टीमनं तपास सुरु केला आहे. अद्याप या स्फोटाचं कारण समजू शकलेलं नाही. जम्मू विमानतळावर एअरफोर्स स्टेशनवर रात्री उशिरा स्फोटाच आवाज ऐकू आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री 1.50 वाजेच्या सुमारास स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटात एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जम्मू विमानतळावर असलेल्या एअरफोर्स स्टेशनमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला. हा परिसर उच्च सुरक्षा अंतर्गत येतो. 5 मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडही घटनास्थळी उपस्थित आहे. दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सैन्य दलाला लक्ष करत हल्ला केला. श्रीनगर (Srinagar)मधील बाबरशाह परिसरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला (Grenade attack on CRPF team) केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. शनिवारी श्रीनगरमधील बाबरशाह परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यातून सीआरपीएफ पथकाचे जवान बचावले मात्र, तीन नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेननंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
  Published by:Pooja Vichare
  First published: