सर्वात वजनदार उपग्रहाचं आज प्रक्षेपण

सर्वात वजनदार उपग्रहाचं आज प्रक्षेपण

  • Share this:

05 जून : भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे आज जीएसएलव्ही मार्क ३ या पूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचं प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-१९ हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार असून, या प्रक्षेपकाद्वारे भविष्यकाळात भारतीय अंतराळवीर भारतीय भूमीतून अवकाशात धाडणंही शक्य होणार आहे.

भारताचे आतापर्यंतचे सर्वांत जास्त वजनदार अशा जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकल मार्क-३ अर्थात जीएसएलव्ही एमके-३ या उपग्रह प्रक्षेपकाचं वजन पाच पूर्णभारीत बोइंग जम्बो जेटइतकं किंवा पूर्ण वाढ झालेल्या २०० हत्तींइतकं भरतं. सध्या हा प्रक्षेपक अनेकांचे लक्ष वेधून घेतो आहे. हे भारताचे भविष्य असून, याद्वारे भारतीय अंतराळवीर नेणे शक्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 12:40 PM IST

ताज्या बातम्या