जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'माझ्या नवऱ्याचं कोणाशी अफेअर आहे का?', महिलेच्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं हटके उत्तर

'माझ्या नवऱ्याचं कोणाशी अफेअर आहे का?', महिलेच्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं हटके उत्तर

व्हिडीओ

व्हिडीओ

नवरा-बायकोतील भांडणं किंवा कुरबुरी सामान्य असतात. नवरा वेळ देत नाही, अशी बऱ्याच बायकांची त्यांच्या पतीबद्दल तक्रार असते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 7 मार्च : नवरा-बायकोतील भांडणं किंवा कुरबुरी सामान्य असतात. नवरा वेळ देत नाही, अशी बऱ्याच बायकांची त्यांच्या पतीबद्दल तक्रार असते. सातत्याने नवऱ्याचं दुर्लक्ष होत असेल तर नक्की त्याचं अफेअर सुरू आहे, अशा शंकाही महिलांना येतात. त्यामुळे त्या त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात किंवा पतीशी भांडतात. बऱ्याचदा काही महिला आपल्या पतीच्या आयुष्यात दुसरी कोणी बाई आहे का? हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या संदर्भात ‘एबीपी लाइव्ह’ने वृत्त दिलं आहे. एक महिला बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे पतीची तक्रार घेऊन पोहोचली होती. तिने पती नीट काम करत नसल्याचं म्हटलं, पण तिचा मूळ मुद्दा मात्र वेगळाच होता. तिचा तोच मुद्दा धीरेंद्र शास्त्री यांनी हेरला आणि तिच्या तक्रारीचं निरसन केलं. यावेळी त्यांनी त्या महिलेला ती चुकत असल्याची जाणीवही करून दिली. नेमकं हे प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊयात.

    व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक महिला बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात आली आहे. महिलेनं सांगितलं की ती तिच्या पतीबद्दल एक तक्रार घेऊन तिथं आली आहे. तिच्या पतीचं लक्ष कामात नीट लागत नाही. तिच्या नवऱ्यावर कोणी काही जादू केली आहे का? असा प्रश्न तिने विचारला होता. यावर धीरेंद्र शास्त्री त्या महिलेला एक चिठ्ठी वाचून दाखवतात. त्यात महिला आपल्या पतीच्या वागण्यामुळे चिंतेत असल्याचं लिहिलेलं असतं. तिचा नवरा गप्प राहतो आणि तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असंही त्यात लिहिलं असतं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    महिलेचं म्हणणं ऐकून घेतल्यावर बाबा धीरेंद्र दावा करतात की ती महिला प्रत्यक्षात तिच्या पतीचे अफेअर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तिथे आली आहे. ती महिलाही हसत त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देते. महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री म्हणतात की, दोन्ही बाजू चुकीच्या आहेत. याचा अर्थ असा समोर येत आहे की तिचा नवरा चुकीच्या मार्गावर जात आहे, परंतु त्याने अद्याप कोणतीही चूक केलेली नाही. तसेच, महिलेचा संशयी स्वभाव ही तिची चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात