05 आॅगस्ट : व्यंकय्या नायडू हे देशाचे नवे उपराष्ट्रपती निवडले गेलेत. नायडूंना 516 मतं मिळाली, तर गोपालकृष्ण गांधींना 244 मतं मिळाली. मोठ्या फरकाने व्यंकय्या नायडू विजयी झाले. व्यंकय्या नायडू आधी मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होते. त्यांनी शहरी विकासमंत्री म्हणून काम पाहिलं. नव्या उपराष्ट्रपतींचा हा अल्पपरिचय… कोण आहेत व्यंकय्या नायडू? मोदी मंत्रिमंडळात नायडूंनी केंद्रीय शहरी विकास मंत्री म्हणून काम पाहिलं अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात नायडू हे ग्रामीण विकासमंत्री होते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही 2002 ते 2004 पर्यंत व्यंकय्यांनी काम केलं व्यंकय्या नायडूंचा जन्म हा आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यातला, साल 1949 आंध्र विद्यापीठातून कायद्याची पदवी, तिथंच एबीव्हीपीचे नेते, मूळचे संघ स्वयंसेवक आंध्र विधानसभेत उदयगिरीचे आमदार म्हणून दोनदा नेतृत्व जेपींच्या विद्यार्थी चळवळीत सहभाग, आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही 1998 साली पहिल्यांदा कर्नाटकातून राज्यसभेवर, नंतर दोन वेळेस निवड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.