झाकीर नाईकच्या विरोधातील रेड कॉर्नर नोटीस रद्द ; एनआयएला धक्का

भारत सरकारकडे त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची ही नोटीस रद्द होणं म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रनेसाठी (एनआयएला) मोठा धक्का आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2017 12:02 PM IST

झाकीर नाईकच्या विरोधातील रेड कॉर्नर नोटीस रद्द ; एनआयएला धक्का

17 डिसेंबर : वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशन संस्थेचा संस्थापक झाकीर नाईक याच्याविरुद्ध जारी करण्यात आलेली रेड कॉर्नर नोटीस इंटरपोलने रद्द केली आहे. भारत सरकारकडे त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची ही नोटीस रद्द होणं म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी (एनआयएला) मोठा धक्का आहे.

झाकीर नाईक नेहमी तरुणांना भडकावणारी भाषणं करतो, त्याचप्रमाणे त्याच्या संस्थेमार्फत त्याने परदेशातून अनेक बेहिशेबी देणग्या जमवल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या सगळ्याबाबत त्याना अनेक नोटीसा बजावण्यात आल्या होत्या पण त्यातल्या कोणत्याही नोटीसवर हजर न राहिल्याने झाकीर नाईक याला अटक होण्याची शक्यता आहे. त्याची गैरहजेरी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत अजामीनपत्र वॉरंट बजावण्याची मागणी सरकारने केली आहे.

पण इंटरपोलच्या या निर्णयावर झाकीर नाईकने आनंद व्यक्त केला आहे. त्याने सोशल मीडियावर मी खूप खूश आहे असं सांगत एक व्हिडिओ व्हायरल केला आहे.

दरम्यान या निर्णयानंतर झाकीर नाईक विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी एनआयए नव्याने अर्ज दाखल करणार असल्याचे एनआयएच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2017 11:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...