• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • इंदिरा गांधींनी JRD Tata यांना लिहिलेले पत्र होतंय व्हायरल; वाचा काय म्हटलं होतं पत्रात

इंदिरा गांधींनी JRD Tata यांना लिहिलेले पत्र होतंय व्हायरल; वाचा काय म्हटलं होतं पत्रात

आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनीही हे पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 जुलै : 'तुम्हाला कोणत्याही विषयावरचे विचार मांडायचे असतील, तर तुम्ही केव्हाही मला भेटू शकता, मग ते विचार अनुकूल असोत किंवा टीका करणारे असोत...' या ओळी आहेत 5 जुलै 1973 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी यांनी टाटा ग्रुप ऑफ कंपनीजचे (Tata Group of Companies) मालक जे. आर. डी. टाटा (JRD Tata) यांना लिहिलेल्या पत्राच्या. हे पत्र सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आहे. आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनीही हे पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे. 'एक शक्तिशाली पंतप्रधान आणि एक दिग्गज उद्योगपती यांच्यामध्ये घडलेला हा व्यक्तिगत पत्र संवाद म्हणजे खरंच Sheer Class आहे,' असं गोएंका यांनी या पत्रासोबत ट्विटरवर लिहिलं आहे. या पत्रात काय लिहिलेलं आहे? या पत्राच्या पहिल्या परिच्छेदात इंदिरा गांधींनी लिहिलं आहे, 'तुम्ही पाठवलेले परफ्यूम्स (Perfumes) मला खूप आवडले आहेत. खूप धन्यवाद. या थाटाच्या जगापासून मी खूप दूरच आहे. त्यामुळे मला याबद्दल फारसं काही माहिती नाही. आता मात्र मी हे नक्की वापरीन.' दुसऱ्या परिच्छेदात त्या लिहितात, 'तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. तुम्ही मला भेटण्यात किंवा लिहिण्यात काही संकोच करू नका. तुम्हाला कोणत्याही विषयावरचे विचार मांडायचे असतील, तर तुम्ही केव्हाही मला भेटू शकता, मग ते विचार अनुकूल असोत किंवा टीका करणारे असोत... तुम्हाला आणि Thelly ला शुभेच्छा. Yours sincerely, Indira Gandhi. ' तारीख पे तारीख...5 वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने तरुणाचा कोर्टातच राडा; कंप्यूटर, फर्निचरची तोडफोड हे पत्र सध्या व्हायरल झालं आहे. हर्ष गोयंका यांनीही हे पत्र शेअर केलं आहे. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दैनंदिन घटनांसोबतच जुने संदर्भ किंवा अन्य अनेक गोष्टींबद्दल ते ट्विट्स करत असतात. आता त्यांनी केलेलं हे ट्विटही लोकांना आवडत आहे. लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युझरने लिहिलं आहे, 'गोएंकाजी, तुम्ही एकापाठोपाठ एक रत्न शोधून पुढे आणत आहात. खूप चांगली पोस्ट, किती चांगल्या व्यक्ती होत्या त्या.' आवरा!आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाने चक्क हेलिकॉप्टरमधून आणली नवी नवरी! पाहा 'इंदिरा गांधी महान नेत्या होत्या. गोयंका, बिर्ला, टाटा आणि बजाज हे उद्योगपती जगासाठी गौरवास्पद आहेत,' असंही एका युझरने लिहिलं आहे. जेआरडी टाटा स्वहस्ताक्षरात खूप पत्रव्यवहार करत. केवळ परिवार, सहकारी एवढंच नव्हे, तर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासारख्या समकालीन नेत्यांशीही त्यांचा नियमित पत्रव्यवहार असे.
  First published: