बेंगलुरू, 16 ऑगस्ट: गरीब आणि मध्यमवर्गीयांना 1 रूपयात जेवण देणारी अम्मा कँटीन ही योजना तामिळनाडू सरकारने सुरू केली होती. या योजनेचा तामिळनाडूतील गोर गरीबांना खूप फायदा झाला होता. त्या योजनेपासून प्रेरणा घेऊन आता गरीबांना आणि मध्यमवर्गीयांनी स्वस्त जेवण देणारी इंदिरा कॅन्टीन योजना कर्नाटक सरकारने सुरू केली आहे. इंदिरा कॅंटीनमध्ये नाश्ता 5 रूपयात, तर दुपारचं आणि रात्रीचं जेवण 10 रूपयात मिळणार आहे. या योजनेचं उद्घाटन राहूल गांधी यांनी केलं. ही योजना सुरू केल्याबद्दल राहुल गांधीनी कर्नाटक सरकारचं अभिनंदन केलं. तसंच या कॅंटीनमध्ये जेवण घेण्यासाठी भाजप नेते रांगेत उभे राहतील अशी फिरकीही त्यांनी घेतली.
Proud that it is a Congress govt that conceptualized this canteen; Breakfast to be served in Rs. 5, lunch/dinner in Rs 10: RG #IndiraCanteen pic.twitter.com/sdV3ac6syi
— ANI (@ANI) August 16, 2017