मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘तुम्हीही युपीचे, मीही युपीचा’, वाक्य ऐकून अध्यक्षांनी पैलवानाला दिली कानशिलात

‘तुम्हीही युपीचे, मीही युपीचा’, वाक्य ऐकून अध्यक्षांनी पैलवानाला दिली कानशिलात

स्टेजवर आलेल्या पाहुण्यांकडे वशिला लावण्याचा प्रयत्न करणं एका पैलवानाला चांगलंच महागात पडलं आहे.

स्टेजवर आलेल्या पाहुण्यांकडे वशिला लावण्याचा प्रयत्न करणं एका पैलवानाला चांगलंच महागात पडलं आहे.

स्टेजवर आलेल्या पाहुण्यांकडे वशिला लावण्याचा प्रयत्न करणं एका पैलवानाला चांगलंच महागात पडलं आहे.

  • Published by:  desk news

रांची, 18 डिसेंबर: वय (Age) बसत नसतानाही अंडर-15 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत (Under 15 national wrestling championship) वशिला लावण्याची शिफारस करणाऱ्या पैलवानाला भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी भर स्टेजवरच कानशिलात (Slapped on stage) लगावल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. रांचीमध्ये सुरु असणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत उत्तर प्रदेशातील एका पैलवानाचे वय जास्त असल्यामुळे त्याला बाद करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार प्रवेशाची अट असल्यामुळे सर्व तरतुदींचं काटेकोरपणे पालन करण्यात येत होतं. मात्र आपण अपात्र असतानाही या पैलवानाने केलेला अगोचरपणा त्याच्या चांगलाच अंगलट आला.

पैलवान गेला स्टेजवर

आपल्याला अंडर-15 कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा असल्याचं त्याने आयोजकांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या सर्टिफिकेटनुसार त्याचं वय 15 वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळे त्याला स्पर्धेतून बाद करण्यात आलं होतं. त्यानंतर हा तरूण थेट स्टेजवर गेला आणि तिथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना भेटला. त्याने आपल्याला कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. त्यावर वय बसत नसल्यामुळे तुला स्पर्धेतून बाद करण्यात आल्याचं सिंह यांनी त्याला सांगितलं. तरीही पैलवान हट्टाला पेटला आणि आपल्याला खेळायची इच्छा असल्याचा तगादा त्याने लावला.

हे वाचा-अंध असूनही नियतीला झुकवलं, एका जगप्रसिद्ध महिला फोटोग्राफरची कहाणी

स्टेजवरच भडकावली श्रीमुखात

अध्यक्ष सिंह यांनी बराच वेळ त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर त्याने ‘आप भी युपी के है, मै भी युपी का हूं, जरा कुछ..’ असं म्हणत त्यांच्याकडे वशिला लावण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून संतापलेल्या सिंह यांनी स्टेजवरच त्याच्या श्रीमुखात तीन चार भडकावल्या. या प्रकारामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. आयोजकांनी तातडीने मध्यस्थी करत पैलवानाला स्टेजवरून खाली नेलं आणि मैदानाच्या बाहेर सोडलं. रांचीत दिवसभर याच घटनेची चर्चा रंगली होती.

First published:

Tags: Ranchi, Uttar pardesh