• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भारतीयांच्या वाट्याच्या लशी निर्यात केल्या नाहीत; सीरम संस्थेनं दिलं स्पष्टीकरण

भारतीयांच्या वाट्याच्या लशी निर्यात केल्या नाहीत; सीरम संस्थेनं दिलं स्पष्टीकरण

Corona Vaccination: देशाला सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लशीची नितांत गरज आहे. असं असताना केंद्र सरकारनं लशी निर्यात (Vaccine Export) करायला प्राधान्य दिल्याचा आरोपी अनेकांकडून केला जात आहे. याबाबत आता सीरम इन्स्टिट्युननं स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचे रुग्ण (Corona cases in India) झपाट्यानं वाढत आहेत. संपूर्ण भारत देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत (Corona virus 2nd wave) सापडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून देशात दररोज 4 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू (corona patients death) होतं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, देशात व्यापक प्रमाणावर लसीकरण (vaccination) करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. यानंतर लशीच्या निर्यातीवरून राजकारण सुरू झालं आहे. देशाला कोरोना प्रतिबंधात्मक लशीची गरज असताना केंद्र सरकारनं लशी निर्यात (Vaccine Export) करायला प्राधान्य दिलं, असा आरोपी विरोधी पक्षांकडून केला जात आहे. लशीच्या निर्यातीवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर, जगातील अग्रगण्य लस उत्पादक संस्था सीरम इन्स्टिट्युटनं (SII) स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी एक निवेदन जारी करत म्हटलं की, भारत हा एक मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशाचं 2-3 महिन्यांत लसीकरण करणं शक्य नाही. सोबतचं आम्ही भारतीयांसाठी असलेल्या लसी निर्यात केल्या नाहीत. संपूर्ण भारताचं लसीकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं स्पष्टीकरण सीरम इन्स्टिट्यूटनं दिलं आहे. सीरम इन्स्टिट्युटनं आपल्या निवेदनात पुढं म्हटलं की, जानेवारी महिन्यात आपल्याकडे कोरोना प्रतिबंधात्मक लशीचा भरपूर साठा उपलब्ध होता. त्यावेळी देशात कोरोना लसीकरण मोहिमेनं वेग घेतला नव्हता. शिवाय कोरोना विषाणूची दुसरी लाटही आली नव्हती. त्यामुळे भारतीयांनी कोरोना लशीशिवाय कोरोनावर मात केल्याचं सर्वांना वाटलं. यामुळे देशातली कोरोना लसीकरण मोहिम आणखी मंदावली. दरम्यानच्या काळात भारताला लशीची गरज नव्हती. त्यामुळे माणुसकीचा धर्म निभावत अन्य देशांना लस निर्यात केली गेली. हे ही वाचा-कोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश पण त्यानंतर जेव्हा भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. तेव्हा याचं देशांनी भारताला मदत केली. लस निर्मितीबाबत विचार केला तर आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. शिवाय आम्ही सतत लशीचं उत्पादन वाढवण्यावर भर देत आहोत. त्यामुळे भारताला गरज असताना आम्ही लस निर्यात केली नाही, असं स्पष्टीकरणही सीरम इन्स्टिट्युटकडून देण्यात आलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: