जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारताचा चीनला आणखी एक दणका! 59 Chinese Apps वर कायमची बंदी घालण्याची तयारी

भारताचा चीनला आणखी एक दणका! 59 Chinese Apps वर कायमची बंदी घालण्याची तयारी

भारताचा चीनला आणखी एक दणका! 59 Chinese Apps वर कायमची बंदी घालण्याची तयारी

भारत सरकारने (indian Government) सात महिन्यांपूर्वी 59 चिनी अ‍ॅप्सना (59 chinese apps) कारणे दाखवा नोटीस (Notice) पाठवली होती. आता या अ‍ॅप्सना कायमचं बंद (Forever ban) करण्यासाठी सरकारने नवीन नोटीस पाठवली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 26 जानेवारी: ऐन लॉकडाऊनच्या काळात चीनने गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. यामध्ये भारतीय सैन्याची मोठी जीवितहानी झाली होती. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने सात महिन्यांपूर्वी 59 चिनी अ‍ॅप्सना (Chinese Apps) कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. आता या अ‍ॅप्सना सरकारने नवीन नोटीस पाठवली आहे, जेणेकरून त्यांच्यावर कायमची बंदी घालता येईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने  (Ministry of Electronics and Information Technology) गेल्या आठवड्यात जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, यापूर्वी जारी केलेल्या नोटिसवर कंपन्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं नाही. त्यामुळे आता सरकार या अॅप्सवर कायमची बंदी घालण्यास तयार आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये भारत सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. सरकारने ज्या कंपन्यांवर बंदी घातली त्यामध्ये TikTok, Helo App, Vchat, अलिबाबा, UC Brouser आणि यूसी न्यूज, शीन, क्लब फॅक्टरी, लाइक, बिगो लाइव्ह, क्लॅश ऑफ किंग्ज आणि कॅम स्कॅनर अशा विविध अॅप्सचा समावेश आहे. भारत सरकारने माहिती तंत्रज्ञानाच्या कलम 69 ए अंतर्गत या अॅप्सवर बंदी घातली होती. या विषयातील एका तज्ज्ञ अधिकाऱ्याने सांगितलं की, या सर्व अ‍ॅप्सवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर  भारत सरकारने 2 सप्टेंबर रोजी 118 Apps वर बंदी घातली होती. तर नोव्हेंबरमध्ये आणखी 43 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यावळे बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये अलीएक्सप्रेस सारख्या अ‍ॅप्सचा देखील समावेश होता. या व्यतिरिक्त पब्जी मोबाइल गेम, स्नॅक व्हिडिओ, कॅमकॉर्ड, वी वर्क चाइना आणि वीडेट आदी अॅप्सवर देखील बंदी घालण्यात आली होती.  मीडिया रिपोर्टनुसार, सरकारच्या बंदीनंतर अलिबाबाच्या यूसी ब्राउझरने भारतात काम करणं बंद केलं आहे. डिप्लोमसी स्तरावर भारत आणि चीन यांच्या दरम्यान अजूनही बोलणी चालू आहेत. दोन्ही देशांच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र अद्याप लडाख येथील सीमा प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे भारत सरकारने आर्थिक बाजूने चीनची कोंडी करण्यासाठी चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात