भारताचा पाकिस्तानविरुद्ध पुन्हा मोठा STRIKE : Pok मधले अतिरेकी तळ उद्ध्वस्त

भारताचा पाकिस्तानविरुद्ध पुन्हा मोठा STRIKE : Pok मधले अतिरेकी तळ उद्ध्वस्त

पाकिस्तानच्या घुसखोरीला आव्हान देत भारताने पुन्हा एकदा ताबारेषेपलीकडे थेट लक्ष्यभेद साधत मिसाइल हल्ला केला आणि तोफांचा मारा करत पाकिस्तानी सैनिकांना टिपलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : मागच्या आठवड्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष ताबारेषेवर कुरापती काढत भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पुन्हा एकदा ताबारेषेपलीकडे थेट मारा करत पाकव्याप्त काश्मीरमधले लाँचिंग पॅड उद्ध्वस्त केले. थेट लक्ष्य साधून मारा करत (with pin point accuracy)केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानचे 8 सैनिक मारले गेले. गेल्या आठवड्यातल्या कारवाईची माहिती सरकारी सूत्रांकडून आता समोर येत आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानने ताबा रेषेपाशी गोळीबार सुरू केला होता. ताबारेषेवर भारतीय सैन्याला गुंतवून ठेवत दहशतवादी भारतीय हद्दीत घुसवण्याचा डाव भारताने हाणून पाडला. यामध्ये भारताचे 5 सैनिक धारातीर्थी पडले. यात महाराष्ट्राचे दोन सुपुत्रही शहीद झाले होते.

या पाकिस्तानच्या घुसखोरीला आव्हान देत भारताने पुन्हा एकदा ताबारेषेपलीकडे थेट लक्ष्यभेद साधत मिसाइल हल्ला केला आणि तोफांचा मारा करत पाकिस्तानी सैनिकांना टिपलं. त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यातले अतिरेक्यांचे तळही उद्ध्वस्त केले.

पाकिस्तानी सैन्याने गेल्या आठवड्यात काश्मीर खोऱ्यात केलेल्या गोळीबारामध्ये काश्मिरी नागरिकही जखमी झाले होते. पाक सैनिक मुद्दाम नागरिकांना लक्ष्य करत असल्याचं लक्षात येताच भारताने आक्रमक उत्तर दिलं आणि पाकिस्तानला धडा शिकवला.

अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात 21 निरपराध नागरिकांनी पाकिस्तानच्या गोळीबारात जीव गमावला होता.

भारताने ताबारेषेपलीकडे घुसखोरांना तयार करणाऱ्या पाकिस्तानी तळांवर हल्ला केला. यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानी आणि विदेशी अतिरेक्यांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात भारताच्या बाजूचं फारसं नुकसान झालेलं नाही, असंही सरकारी सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, भारताने PoK मध्ये केलेल्या एअर स्ट्राइकच्या बातमीत तथ्य नाही, असं भारतीय लष्कराचे सरव्यवस्थापक लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह Director General Military Operations (DGMO) यांनी म्हटलं आहे.

'भारतीय लष्कराने आज कुठलीही कारवाई केली नाही', असं लष्कराने स्पष्ट केलं आहे. पण त्याचबरोबर गेल्या आठवड्यातल्या कारवाईच्या बातमीबद्दल मात्र कुठलीही माहिती दिलेली नाही आणि ती कारवाई नाकारलेलीसुद्धा नाही.

First published: November 19, 2020, 7:31 PM IST

ताज्या बातम्या