मराठी बातम्या /बातम्या /देश /

Indian Army : बर्फ वितळल्यामुळे जवानाचा मृतदेह दिसला; 16 वर्षांपासून कुटुंब होतं प्रतीक्षेत

Indian Army : बर्फ वितळल्यामुळे जवानाचा मृतदेह दिसला; 16 वर्षांपासून कुटुंब होतं प्रतीक्षेत

जेव्हा लष्कराचा जवान शहीद होतो, तेव्हा खूप दु:ख होतं. मात्र कोणत्याही कुटुंबासाठी 16 वर्षांची प्रतिक्षा करणे त्रासदायक आहे.

जेव्हा लष्कराचा जवान शहीद होतो, तेव्हा खूप दु:ख होतं. मात्र कोणत्याही कुटुंबासाठी 16 वर्षांची प्रतिक्षा करणे त्रासदायक आहे.

जेव्हा लष्कराचा जवान शहीद होतो, तेव्हा खूप दु:ख होतं. मात्र कोणत्याही कुटुंबासाठी 16 वर्षांची प्रतिक्षा करणे त्रासदायक आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुरादनगर, 26 सप्टेंबर :  जेव्हा लष्कराचा (Indian Army) जवान शहीद होतो, तेव्हा खूप दु:ख होतं. मात्र कोणत्याही कुटुंबासाठी 16 वर्षांची प्रतिक्षा करणे त्रासदायक आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मुरादानगर मधील हिसाली गावात राहणारा जवान अमरीश त्याची यांचा मृतदेह तब्बल 16 वर्षांनंतर बर्फात दबलेला सापडला.

जवान अमरीश त्यागी 23 ऑक्टोबर, 2005 मध्ये सियाचीनमधून परतताना उत्तराखंडमधील हरशीलच्या दरीत पडले होते. त्यांच्यासोबत असलेल्या 3 जवानांचा मृतदेह सापडाला. मात्र त्यांची काही माहिती मिळाली नव्हती. 2 दिवसांपूर्वी बर्फ वितळल्यानंतर जवानाचा मृतदेह दिसला. कपडे आणि काही कागदपत्रांच्या आधारावर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, जवानाच्या नातेवाईकांना वाटत होतं की, अमरीश जिवंत असतील आणि शत्रूच्या ताब्यात असतील. म्हणून पितृपक्षातही त्यांना जवानाचं कधीच श्राद्ध घातलं नाही. आता अमरीश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Indian Army Soldiers dead body found after 16 years)

 2005 मध्ये हरशील दरीत पडले होते

अमरीश त्यागी वर्ष 1995-96 मध्ये मेरठमधीव सैन्यात भरती झाले होते. अनेक ठिकाणी बदली झाल्यानंतर 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान ते लेह लडाखमध्ये तैनात होते. अमरीश यांचं विमानातून सर्वात उंचीवरून उडी मारल्यामुळे बरंच नाव झालं होतं. अमरीश यांच्या भावाने सांगितलं की, अमरीश यांनी 2005 मध्ये सियाचिनवर झेंडा फडकवला होता. एका मोहीमेवरुन परतत असताना 23 ऑक्टोबर 2005 मघ्ये हरशील भागात एक अपघात झाला आणि 3 अन्य जवानांसह ते दरीत कोसळले. या अपघातात तिघांचे मृतदेह सापडले. मात्र दरी खूप खोल असल्या कारणाने अमरीश यांच्याबद्दल काहीच माहिती हाती लागली नाही. सैन्याकडून त्यांचा शोध सुरू होता मात्र काहीच खूणा सापडल्या नाहीत. या 16 वर्षात बऱ्याच गोष्टी घडल्या. पूत्र वियोगामुळे अमरीश यांच्या आईचा मृत्यू झाला. अमरीश यांच्या अपघाताच्या काही दिवसात त्यांच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर वर्षभरात त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. सोमवारपर्यंत अमरीश यांचा मृतदेह येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Indian army, Ladakh