Home /News /national /

...म्हणून आपण इतकी वर्ष ऐकत असलेली भारतीय सैन्याच्या बॅण्डची धून बदलणार!

...म्हणून आपण इतकी वर्ष ऐकत असलेली भारतीय सैन्याच्या बॅण्डची धून बदलणार!

भारतीय सैन्य (Indian Army) आपल्या अनेक जुन्या परंपरांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. यामध्ये गेल्या काही दशकांपासून वाजवल्या जाणाऱ्या बॅण्ड धून (Band Tunes), स्वातंत्र्यापूर्वीचे सैन्य पुरस्कार (Military Awards), मेसच्या प्रक्रियेचा समावेश आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 12 जून : भारतीय सैन्य (Indian Army) आपल्या अनेक जुन्या परंपरांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. यामध्ये गेल्या काही दशकांपासून वाजवल्या जाणाऱ्या बॅण्ड धून (Band Tunes), स्वातंत्र्यापूर्वीचे सैन्य पुरस्कार (Military Awards), मेसच्या प्रक्रियेचा समावेश आहे. तसेच सैनिकी अभ्यासात भारतीय युद्धातील नायकांवर अधिक भर देण्यात येणार आहे. हे सर्व बदल भारतीय सशस्त्र दलात भारतीयकरण करण्याच्या प्रक्रियेअंतर्गत केले जातील. अनेक धून इंग्रजांच्या काळातील सध्या भारतीय सैन्यातील अनेक बॅण्ड धून या इंग्रजांच्या काळातील आहेत. यातील काही धून आता परंपरा झाल्या असून त्या केवळ विशेष कार्यक्रमांमध्येच वाजवल्या जातात. ‘ओल्ड लॅन्ग सिने’ ही धून सर्व परेडमध्ये (Army parade) वाजवली जाते आणि ‘अबाइड विथ मी’ ही सर्व रिट्रीट सोहळ्यांमध्ये वाजवली जाते. नवीन धूनचा शोध सुरू धून बदलण्याचा निर्णय अचानक घेण्यात आलेला नाही. द प्रिंटच्या एका रिपोर्टमध्ये, संरक्षण विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार योग्य अर्थासह या धून बदलण्यासाठी भारतीय धून शोधण्याचं काम आधीपासून सुरू आहे. यापैकी ज्या धून मिळतील त्या भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत बदलल्या जातील. Indian Army, Defence department, Indian Armed Forces, Band Tuenes Military Awards, military Honours, Military Mess Traditions, Military Studies, British Indian Army, जुने सैन्य सन्मान आणि पुरस्कार स्वातंत्र्यकाळापूर्वी पासून चालत आलेले सन्मान बंद करणं योग्य असेल की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. कारण हे सन्मान युनिट्सला त्यांच्या अनन्यसाधारण कामगिरीसाठी दिले जायचे. यापैकी एक महत्वाची परंपरा म्हणजे सैन्य दलांनी सैन्याच्या शौर्याचा उत्सव साजरा करणं आणि युद्धाचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला जातो. यापैकी बरेच सन्मान स्थानिक भारतीय राजाविरूद्ध लढ्यात शौर्य दाखविणाऱ्या ब्रिटिश इंडियन आर्मीच्या (British Indian Army) यूनिटला दिले जात होते. मेसमधील परंपरा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्रजांच्या काळातील मेसच्या अनेक प्रक्रिया स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बदलल्या आहेत. आता काही परंपरांना खरच बदलण्याची गरज आहे का? किंवा ते कशा पद्धतीने बदलता येईल, याची पडताळणी सुरू आहे. Indian Army, Defence department, Indian Armed Forces, Band Tuenes Military Awards, military Honours, Military Mess Traditions, Military Studies, British Indian Army, सैनिकी अभ्यासात बदल देशातील अनेक सैनिकी अभ्यासात सुन जू यांच्या लेखनाचा उल्लेख आढळतो. त्यांनी जुन्या चिनी सैनिकी ग्रंथात आर्ट ऑफ वॉर लिहिलेले आहे. याशिवाय ब्रिटिश रणनीतिकार लिडल हार्ट आणि जर्मन जनरल क्लॉझविट्झ यांचा देखील उल्लेख आहे. परंतु कौटिल्यच्या अर्थशास्त्रासारख्या (Artha shastra) आधुनिक काळातील देशी ग्रंथांचा उल्लेख कमी आहे. त्यामळे धोरणात्मक अभ्यासामध्ये यापुढे देशी ग्रंथांवर अधिक भर दिला जाईल. भारतीयकरण केवळ उपकरणं आणि शस्त्रांचच नाही भारतीय इतिहासात असे अनेक योद्धे आहेत ज्यांनी आपल्या युद्ध कौशल्यांची उत्कृष्ट उदाहरणं दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे गोरिल्ला तंत्र आणि रोजा राज चोल -1 यांची नौदल युद्ध कौशल्ये याची उत्तम उदाहरणं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेचे भारतीयकरण करण्यावर भर दिल्यानंतर हे सर्व प्रयोग सुरू आहेत. यामध्ये केवळ देशातील उपकरणं आणि शस्त्रं तयार करणंच नाही तर विचारसरणी, प्रक्रिया आणि परंपरा यांतही बदल करण्याचा समावेश आहे.
    First published:

    Tags: Indian army, Military

    पुढील बातम्या