लडाख, 07 जुलै : भारत-चीन यांच्यात गलवान खौऱ्यातील तणार कमी होताना दिसत आहे. सोमवारी चिनी सैन्यानं मागे हटण्यास सुरुवात केली आहे, परंतु तरीही भारताने कठोरपणा कायम ठेवला आहे. सोमवारी रात्री लढाऊ हेलिकॉप्टर अपाचेनं यांनी भारत-चीन सीमेजवळ आपली कारवाई केली. येथे उशिरा रात्री अपाचे, चिनूक यांच्यासह अनेक हवाई दलाची विमानं उडताना दिसली आणि त्यांनी चीनवर बारीक नजर ठेवली. अपाचे हेलिकॉप्टरने भारत-चीन सीमेच्या फॉरवर्ड बेसवर पाळत ठेवण्यासाठी उड्डाण केले. भारतीय वायुसेना सीमेवर सतत सराव करीत असून प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी करत आहे. फक्त अपाचेच नाही तर चिनूक हेलिकॉप्टरनेही येथे सराव केला.
#WATCH Indian Air Force (IAF) Chinook heavylift helicopter at a forward airbase near India-China border carrying out night operations. pic.twitter.com/mDBD9dmZpa
— ANI (@ANI) July 7, 2020
अपाचे हेलिकॉप्टर व्यतिरिक्त मिग -29सह इतर अनेक लढाऊ विमान यापूर्वी लेहमध्ये सराव करताना दिसली होती. मुख्य म्हणजे गेल्या वर्षी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 8 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाली. त्यानंतर सैन्य मजबूत करण्यात आले. अपाचे हेलिकॉप्टरची निर्मिती बोईंग या अमेरिकन कंपनीने केली आहे.
दरम्यान, भारतीय हवाई दलाचे सर्व पायलट प्रशिक्षित आहेत. आधुनिक प्लॅटफॉर्मवर आणि जवानांच्या मदतीने कोणत्याही वातावरणात काम करण्यास सज्ज असल्याचे ग्रुप कॅप्टन ए राठी यांनी सांगितले. राठी हे भारत-चीन सीमेजवळील फॉरवर्ड एअर बेसवर ज्येष्ठ लढाऊ पायलट आहेत.
या लढाऊ विमानाची मारक शक्ती धोकादायक आहे, तसेच त्याची रचना अशी आहे की ती रडारमध्ये पकडली जाऊ शकत नाही. अपाचे सुमारे 280 किमी ताशी दरात उडते, म्हणून 16 अँटी-टँक क्षेपणास्त्र सोडण्याची क्षमता आहे. हे हेलिकॉप्टर सुमारे तीन तास न थांबता उड्डाण करू शकते. संपादन-प्रियांका गावडे.

)








