IndiaStrikesBack- भारताच्या कारवाईला घाबरून जीव मुठीत घेऊन पळतोय मसूद अजहर

IndiaStrikesBack- भारताच्या कारवाईला घाबरून जीव मुठीत घेऊन पळतोय मसूद अजहर

पाकिस्तान सरकारने २१ फेब्रुवारीला मसूद अजहरला रावलपिंडी येथील एका सुरक्षित जागेत हलवण्यात आले होते. रावलपिंडी येथे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI चं मुख्यालय आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी २०१९- जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला रावलपिंडी स्थित लष्कराच्या रुग्णालयातून हलवण्यात आले आहे. मसूदला बहावलपुर स्थित कोटघनीच्या जवळपास हलवण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, याआधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने २१ फेब्रुवारीला मसूद अजहरला रावलपिंडी येथील एका सुरक्षित जागेत हलवण्यात आले होते. रावलपिंडी येथे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI चं मुख्यालय आहे.

पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली असून या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर आहे. भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी त्याला ओळखले जाते. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अजहरचं नाव पहिलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर मंगळवारी पहाटे ३.३० वाजता भारतीय वायु दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. यात २०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. १२ मिराज २००० विमानांच्या सहाय्याने वायु दलाने १ हजार किलोचे बॉम्ब हल्ले केले. यात पाकिस्तानच्या पाच जवानांचा मृत्यू झाला.

असा झाला Air Strike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये ३०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये ५ पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला, तर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. २१ मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

मसूद अझरचा मेव्हणा ठार?

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केलं. हवाई दलानं जैशच्या ज्या तलावर कारावाई केली तो तळ जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर लीड करत होता. या हल्ल्यामध्ये ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असले तरी मौलाना युसूफ अझर ठार झाला की नाही? याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हवाई दलाच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली.

पाकची पहिली प्रतिक्रिया

'भारतीय वायूसेनेच्या विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून तीन ते चार मैल आतमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांनी केलेल्या हल्ल्यात कोणतंही नुकसान झालेलं नसून कोणीही जखमी झालेलं नाही,' असं ट्वीट करत पाकिस्तानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल

First published: February 26, 2019, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading