Home /News /national /

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशात कोरोनाचा विस्फोट? तरी महाराष्ट्राची ही आकडेवारी दिलासादायक

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशात कोरोनाचा विस्फोट? तरी महाराष्ट्राची ही आकडेवारी दिलासादायक

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट? 24 तासांत तब्बल 14516 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

    नवी दिल्ली, 20 जून : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. आज सलग सातव्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा 10 हजारहून अधिक आहे. आज 24 तासांत तब्बल 14 हजार 516 नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंतची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. यासह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 4 लाखांच्या घरात गेला आहे. तर, गेल्या 24 तासांत 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 3 लाख 95 हजार 048 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 1 लाख 68 हजार 269 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 2 लाख 13 हजार 831 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत 12 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारताचा रिकव्हरी रेट भारताचा वाढता आहे. रिकव्हरी रेट आता 53.8% हून 54.1% झाला आहे. यात महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त रुग्ण असले तरी, एक दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रातील निरोगी रुग्णांचा आकडा हा 50% आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3827 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 1935 रुग्ण निरोगी झाले. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 24 हजार 331 झाली आहे. तर, 62 हजार 773 रुग्ण निरोगी झाले आहे. इतर राज्यांची आकडेवारी भारतातील एकूण 25 राज्यांमधील रिकव्हरी रेट हा 50% जास्त आहे. सध्या केवळ 10 राज्यांचा निरोगी रुग्णांची आकडेवारी ही नवीन रुग्णांपेक्षा कमी आहे. संपादन-प्रियांका गावडे
    First published:

    Tags: Corona, Corona virus, Corona virus in india

    पुढील बातम्या