Home /News /national /

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 776 डॉक्टरांचा मृत्यू, महाराष्ट्रात उद्रेक सर्वाधिक असूनही बिहारमध्ये अधिक बळी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 776 डॉक्टरांचा मृत्यू, महाराष्ट्रात उद्रेक सर्वाधिक असूनही बिहारमध्ये अधिक बळी

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 776 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात या लाटेनं थैमान घातलं असलं तरी यातील सर्वाधिक 115 मृत्यू बिहार राज्यात नोंदवले गेले आहेत.

    नवी दिल्ली, 25 जून : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave) आतापर्यंत 776 डॉक्टरांचा (Doctors) मृत्यू (Death) झाला आहे. बिहारमध्ये (Bihar) डॉक्टरांच्या मृत्युंची सर्वाधिक संख्या (Highest Deaths) नोंदवण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात बिहारमध्ये 115 डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशननं (Indian Medical Association) ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत (First Wave) 748 डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सर्वाधिक होता. तरीही डॉक्टरांच्या मृत्युचं सर्वाधिक प्रमाण बिहारमध्ये असल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. IMA नं जाहीर केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 23 तर दिल्लीत 109 डॉक्टरांचा मृत्यू झालाय. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये 62, तमिळनाडूत 50, आंध्र प्रदेशात 40, आसाममध्ये 10,  गुजरातमध्ये 39 आणि झारखंडमध्ये 39 डॉक्टरांचा या काळात मृत्यू झाला आहे. गर्भवती डॉक्टरांचा मृत्यू मरण पावलेल्या डॉक्टरांमध्ये 8 गर्भवती डॉक्टरांचाही समावेश आहे. यामध्ये तमिळनाडूतील 2, तेलंगणातील 2, महाराष्ट्रातील 1 आणि उत्तरेतील राज्यांमधून 3 गर्भवती डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दुसरी लाट ओसतेय भारतात गेल्या 24 तासांत 51, 667 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर देशाचा पॉझिटीव्हीटी दर 2.98 इतका नोंदवण्यात आलाय. पॉझिटीव्हीटी दर 5 टक्क्यांच्या खाली राहण्याचा शुक्रवारचा सलग 18 वा दिवस आहे. तर गेल्या 24 तासांत देशात 1329 नागरिकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. या नोंदीसह देशातील आतापर्यंतच्या एकूण मृत्युंचा आकडा 3 लाख 93 हजार 310 एवढा झाला आहे. डेल्टा व्हेरिअंटची भीती जगातील अनेक देशात सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. भारतातही डेल्टाचे 40 पेक्षा अधिक रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही निर्बंध कडक करण्यात आले असून पुन्हा कडक निर्बंधांच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. सध्या उघडलेले मॉल्स आणि थिएटर्स बंद होणार असून महाराष्ट्रात जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु राहणार आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Coronavirus, Death

    पुढील बातम्या