Home /News /national /

इंधन आयातीमुळे भारत आर्थिक संकटात -नितीन गडकरी

इंधन आयातीमुळे भारत आर्थिक संकटात -नितीन गडकरी

    04 आॅक्टोबर : भारत हा इंधन आयात करत असल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहे असं वक्तव्य देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण यावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गडकरींनी आर्थिक संकटाबद्दल चिंता व्यक्त केली. भारत हा 80 टक्के इंधन आयात करतो अशी माहितीही त्यांनी दिली. या वर्षाच्या सुरुवातीपासून रुपयाची किंमत ही 13 टक्क्यांनी घसरलाय. जी आज सर्वात खराब परिस्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी,अर्थमंत्री अरुण जेटली, इंधनमंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्यात एक बैठक पार पडली. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. सेन्सेक्स तब्बल 850 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीतही 260 अंकांची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घट झाली .शेअर बाजाराच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे 3.13 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. खरं तर बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सचं मूल्यांकन 1,43,71,351.05 कोटी रुपयांवरून 1,40,57,705.04 कोटी रुपयांवर आलं आहे. इराणमध्ये इंधनावर अमेरिकेनं निर्बंध घातले आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढले आहे. भारत हा 80 इंधन आयात करतोय. त्यामुळे भारत हा आर्थिक संकटाचा सामना करत आहे असं सांगत गडकरींनी इंधन आयातीला भारताच्या आर्थिक संकटाला जबाबादार धरलं. ============================================== गीता गोपिनाथ : देशानं दुर्लक्ष केलेली गुणवान भारतीय अर्थतज्ज्ञ
    First published:

    Tags: Nitin gadkari, Petrol, नितीन गडकरी

    पुढील बातम्या