मिर्जापुर, 24 ऑक्टोबर : सध्या सर्वत्र मिर्जापूर वेब सीरिजची चर्चा सुरू आहे. अनेकांनी तर वेब सीरिज रिलिज झाल्याच्या दिवशी अख्खी रात्र जाऊन वेब सीरिज पाहिली. 22 ऑक्टोबर रोजी दुसरा भाग रिलिज झाल्यानंतर सोशल मीडियावरही मिर्जापूरची चर्चा आहे. मात्र आता मिर्जापूरच्या संकटात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील मिर्जापूर जिल्ह्याच्या खासदार आणि अपना दल एस.की राष्ट्रीय अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांनी याविरोधात चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं आहे आणि याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, मिर्जापूर वेब सीरिजच्या माध्यमातून या भाग हिंसक असल्याचे सांगत बदनामी केली जात आहे. या सीरिजच्या माध्यमातून जातीय वैमनस्यही पसरवलं जात आहे. मिर्जापूर जिल्ह्याच्या खासदार म्हणून त्यांनी मागणी केली आहे की, याची चौकशी व्हायला हवी आणि विरोधात कारवाई करा. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मिर्जापूर विकासाच्या मार्गावर आहे आणि हा सामाजिक समरसताचं केंद्र आहे.
माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी एवं माननीय मुख्यमंत्री @myogiadityanath जी के नेतृत्व में मिर्ज़ापुर विकासरत है।यह समरसता का केंद्र है। मिर्ज़ापुर नामक Webseries के ज़रिए इसे हिंसक इलाक़ा बताकर बदनाम किया जा रहा है।इस सीरीज़ के माध्यम से जातीय वैमनस्य भी फैलाया जा रहा है।1/2
— Anupriya Patel (@AnupriyaSPatel) October 24, 2020
मिर्ज़ापुर ज़िले की सांसद होने के नाते मेरी माँग है कि इसकी जाँच होनी चाहिए और इसके विरुद्ध कार्यवाही होनी चाहिए @PrakashJavdekar @narendramodi @myogiadityanath
— Anupriya Patel (@AnupriyaSPatel) October 24, 2020
2/2
हे ही वाचा- VIDEO : भाजप मंत्र्याने मतांसाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं मिर्जापूर वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइन व्हिडीओ 22 ऑक्टोबर रिलिज झाली आहे. वेब सीरिज 23 ऑक्टोबर रोजी रिलिज होणार होती, मात्र ती काही तासांपूर्वीच रिलिज करण्यात आली. मिर्जापूर-2 मध्ये दिव्येंदु शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि पंकज त्रिपाठी सारख्या कलाकार आहे. तर यांचे दिग्दर्शक गुरमीत सिंह आणि मिहीर देसाई आहेत.

)







