जाहिरात
मराठी बातम्या / देश / Income Tax Return for AY2022-23: टॅक्सचा पैसा वाचवायचा आहे का? तर लगेच करा 'हे' काम

Income Tax Return for AY2022-23: टॅक्सचा पैसा वाचवायचा आहे का? तर लगेच करा 'हे' काम

 इन्कम टॅक्स रिटर्न भरणं होणार सोपं? जाणून काय आहे सरकारचा कॉमन आयटीआर प्रस्ताव

इन्कम टॅक्स रिटर्न भरणं होणार सोपं? जाणून काय आहे सरकारचा कॉमन आयटीआर प्रस्ताव

इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये फॉर्म 26AS महत्त्वपूर्ण आहे.

    मुंबई, 15 जुलै: दरवर्षी 31 जुलै ही आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख असते. सरकारच्या वतीने या मुदतीत वाढ केली जाऊ शकते. पण मुदतीत याचा भरणा करणं कधीही चांगलं. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना फॉर्म 26AS ची पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. रिटर्न फाइल करण्याआधी या फॉर्मवर टीडीएसच्या नावाखाली कपात केलेल्या रकमेचा समावेश करण्यात आला आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यायला हवी. इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये फॉर्म 26AS महत्त्वपूर्ण आहे. एका आर्थिक वर्षात आपल्या उत्पन्नातून कपात करण्यात आलेली टीडीएसची रक्कम आणि ती सरकारकडे जमा करण्याची माहिती फॉर्म 26AS मध्ये अंतर्भूत असते. कंपनीच्या वतीने कपात केलेली रक्कम तुमच्या पॅन नंबरसह सरकारकडे जमा करण्यात येते. पगाराव्यक्तिरिक्त बँकेकडून व्याजावरील उत्पन्नावर कपात करण्यात आलेले टीडीएस आणि तुमच्याकडून जमा करण्यात आलेल्या अॅडव्हान्स टॅक्सची माहितीही फॉर्म 26AS मध्ये असते. हेही वाचा - JEE Main 2022 : 100 टक्के मिळवूनही टॉपर नव्य हिसारिया पुन्हा देणार परीक्षा!

     इन्कम टॅक्सच्या नियमानुसार, जेव्हा आपण 10 लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्य असलेलं वाहन विकत घेतो तेव्हा डिलरला तुमच्याकडून टीसीएस कपात करावा लागतो. आपण जी एकूण रक्कम देणार आहोत त्याच्या एक टक्का टीसीएसच्या रूपात गोळा केला जातो. या बदल्यात डीलर तुम्हाला फॉर्म 27D जारी करतो. तुमच्याकडून घेण्यात आलेल्या टीसीएसच्या रकमेची माहितीही फॉर्म 26AS मध्ये समाविष्ट असते.

    फॉर्म 26AS मध्ये चुकीची माहिती असल्यास काय कराल? आपणाला देण्यात आलेल्या टीडीएस प्रमाणपत्रातील माहिती आणि फॉर्म 26AS मधील माहिती यात तफावत असू शकते. अनेक कारणांमुळे फॉर्म 26AS मध्ये देण्यात आलेली माहिती चुकीची असू शकते. यात सुधारणा होणं आवश्यक असतं. चुकीची माहिती देण्याचं कारण काय आहे यावर सुधारणेची प्रक्रिया अवलंबून असते. उदा. कंपनी अथवा बँकेने तुमच्या पॅन नंबरसह सरकारकडे टॅक्स जमा करताना चूक केलेली असू शकते. अशा परिस्थितीत टॅक्स कपात करणारी कंपनी किंवा बँकेशी संपर्क करावा लागेल. कंपनी किंवा बँकेला टीडीएस रिर्टनमध्ये सुधारणा करण्यास सांगितलं गेलं पाहिजे. सुधारणेसह टीडीएस रिर्टन फाइल केल्यानंतर आपल्या फॉर्म 26AS मध्ये बरोबर माहिती दिसून येईल. रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख कोणती ? इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 22 आहे. मागील वर्षीचा (2021-22) इन्कम टॅक्स रिटर्न या तारखेपर्यंत भरणं आवश्यक आहे. काही कारणास्तव या तारखेपर्यंत रिटर्न न भरला गेल्या दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे रिटर्न भरण्याआधी आपल्या फॉर्म 26AS मध्ये दिलेली माहिती पडताळून पाहायला हवी. यात काही चूक असल्यास रिटर्न भरण्याआधी यात सुधारणा केली जाणं आवश्यक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात