जाहिरात
मराठी बातम्या / देश / पतीनेच ठेवलं बायको-मुलीला कैदेत, ओलीस ठेवून करतोय छळ; पोलीस करताहेत सुटकेचा प्रयत्न

पतीनेच ठेवलं बायको-मुलीला कैदेत, ओलीस ठेवून करतोय छळ; पोलीस करताहेत सुटकेचा प्रयत्न

पतीनेच ठेवलं बायको-मुलीला कैदेत, ओलीस ठेवून करतोय छळ; पोलीस करताहेत सुटकेचा प्रयत्न

एका व्यक्तीनं आपली बायको आणि मुलीलाच कैद करून ठेवलं आहे. हे प्रकरण काही काळानंतर उघडकीस आलं आणि घरी पोलीसही पोहोचले पण…

  • -MIN READ
  • Last Updated :

दुमका, 19 जानेवारी : नात्याला साता जन्माचं पवित्र बंधन समजलं जातं. मात्र नवराच आपल्या बायकोला ओलीस ठेवून छळ करू शकेल? फक्त बायकोच नव्हे तर मुलीलाही त्यानं ‘किडनॅप’ केलं आहे आणि त्या दोघींना घरातच एका खोलीत बंद केलं आहे आणि तिथे त्यांचा छळ करत आहे. झारखंडमध्ये (Jharkhand) दुमका (Dumka) इथं या नात्याला तडा देणारी एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं आपली बायको आणि मुलीलाच कैद करून ठेवलं आहे. हे प्रकरण काही काळानंतर उघडकीस आलं. या आरोपीचे सासरे या सगळ्यांना भेटायला म्हणून आरोपीच्या घरी पोहोचले. सोबतच त्यांनी पोलिसांनाही नेलं. मात्र आरोपीनं पोलिसांनाही (police) असं काही धमकावलं, की पोलीस आल्यापावली परत गेले. या आरोपीचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची माहिती आहे. आता पोलिसांनी प्रकरण सोडवण्यासाठी आरोपीच्या वडिलांना संपर्क साधला आहे. हा चित्रविचित्र प्रकार नगर ठाणे क्षेत्रातील एलआयसी कॉलनीतला (LIC Colony) आहे. इथं अजय दुबे नावाच्या एका व्यक्तीनं आपली पत्नी (wife) आणि मुलीला (daughter) कैद करून ओलिस (hostage) ठेवलं होतं. हे प्रकरण तेव्हा समोर आलं, जेव्हा अजय दुबे याचे सासरे (father in law) अजय उपाध्याय हे पाटणा (Patna) इथून निघून आरोपीच्या घरी पोचले. त्यांना पाहताच जावई अजय दुबे यानं लगोलग पत्नी आणि  मुलीला त्याच अवस्थेत ठेवत दरवाजा बंद केला. सोबतच अजयनं सासऱ्यांना धमकी देत म्हटलं, की कुणी  घराच्या आत आलं तर तो आपली पत्नी आणि मुलगी यांना गच्चीवरून खाली फेकून देईल. या गोष्टीची माहिती सासऱ्यांनी पोलिसांना कळवली. मात्र पोलीस आल्यावरही अजयनं तीच धमकी दिल्यानं पोलिसांचा नाईलाज झाला. त्यानंतर महिला पोलीस (woman police) श्वेता कुमारी यांना तिथं पाठवलं गेलं. या पोलीस महिलेनं अजय याच्या वडिलांना फोन लावून कळवलं, की अजय असा वागतो आहे. त्याच्याकडून समजलं, की अजयचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. शिवाय तो दारूचं व्यसनही करतो. मुलीच्या वडिलांनी सांगितलं, की मागच्या तीन दिवसांपासून या अजयनं त्यांच्या मुलीसह नातीला कोंडून ठेवलं आहे. आता महिला पोलीस आणि त्यांचे सहकारी या माणसाची बायको आणि मुलगी यांच्या सुटकेच्या प्रयत्नात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात