भारतात 9 लोकांना मिळतो 100 कोटींपेक्षा अधिक पगार!

देशात 100 कोटी इतका पगार घेणारे लोक असल्याचे समोर आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 08:35 AM IST

भारतात 9 लोकांना मिळतो 100 कोटींपेक्षा अधिक पगार!

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: आयकर विभागाने 2017-18 या आर्थिक वर्षात झालेल्या आयटीआर डेटाचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून देशात 100 कोटी इतका पगार घेणारे लोक असल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार भारतात 9 जण असे आहेत ज्यांना 100 कोटी इतका पगार मिळते. अर्थात 500 कोटी पगारा अद्याप कोणालाही मिळत नसल्यामुळे त्या क्लबमध्ये अद्याप कोणीही नाही. देशात इतका पगार अद्याप कोणालाही मिळत नाही. याशिवाय देशात असे 50 हजार लोक आहेत ज्यांना प्रत्येक वर्षाला 1 कोटी इतका पगार मिळतो. करदात्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे.

काय म्हटल आयकर विभागाच्या अहवालात

- देशातील 2.9 कोटी करदात्यांपैकी 81.5 लाख लोकांचा पगार हा 5.5 लाख ते 9.5 लाख इतका आहे

- 10-15 लाख पगारात 22 लाखाहून अधिक लोक आहेत

- 15-20 लाख पगार असलेल्यांची संख्या 7 लाखाहून अधिक आहे. तर 20-25 लाख पगार घेणाऱ्यांची संख्या 3.8 लाख इतकी आहे.

Loading...

- 25-50 लाख पगार असणाऱ्यांची संख्या 5 लाखाच्या आसपास आहे. तर 50 लाख ते 1 कोटी दरम्यान पगार घेणाऱ्यांची संख्या 1.2 लाख इतकी आहे.

- एक कोटीपेक्षा अधिक पगार असलेल्यांची संख्या 49 हजार 128 इतकी आहे. त्यापैकी केवळ 9 जण असे आहेत ज्यांचा पगार 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

- 100- 500 कोटी पगार घेणाऱ्या सुपर रिच क्लबमध्ये 9 जण आहेत. ज्यांचा वर्षाचा पगार 128 कोटी इतका आहे. अर्थात सुरक्षेच्या कारणामुळे आयक विभागाने त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.

- सर्व घटकांचा विचार करता देशातील करोडपतींच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाड होत ती आता 97 हजार 689 वर पोहोचली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 08:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...