Home /News /national /

भर विधानसभेत तेजस्वी यादव यांचा शाळेतील वर्गमैत्रिणीशी झाला सामना; चर्चा ऐकून विरोधकही खूश

भर विधानसभेत तेजस्वी यादव यांचा शाळेतील वर्गमैत्रिणीशी झाला सामना; चर्चा ऐकून विरोधकही खूश

तेजस्वी यादव यांना बिहार विधानसभेत त्यांची शाळेतील जुनी वर्गमैत्रीण श्रेयसी सिंह भेटली होती. यावेळी ते भर विधानसभेत आपल्या शाळेच्या आठवणीत रममाण झाले होती. त्यांची चर्चा ऐकून विरोधकांनी देखील टेबल वाजवून प्रतिसाद दिला.

    पटना, 24 फेब्रुवारी: राजकीय आखाड्यात दंड थोपटत असताना प्रतिस्पर्धी संघात शाळेतली जुनी वर्गमैत्रिण भेटावी, अशावेळी काय होऊ शकतं, याचा प्रत्यय नुकताच बिहार विधानसभेत आला आहे. राजदचे तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) हे नितिश कुमार (Nitish Kumar) सरकारला आणि भारतीय जनता पक्षाला घेरण्याच्या तयारीत असताना. तेजस्वी यादव यांना जुनी शाळेतील मैत्रिण भेटली आहे. यावेळी ते भर विधानसभेत आपल्या शाळेच्या आठवणीत रममाण झाले आहेत. यावेळी त्यांची राजकीय जुगलबंदी ऐकून विरोधकांनीही टेबल बडवून प्रतिसाद दिला आहे. खरंतर काल सोमवारी बिहार विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आज सभागृहात यावर चर्चा केली जाणार होती. याच मुद्यावर सरकारला घेरण्यासाठी तेजस्वी यादव बोलायला उभे राहिले. त्यावेळी ते काही मुद्दे बोलल्यानंतर त्यांनी क्रिडा विभागाचा उल्लेख केला. यावेळी  भाजपच्या आमदार श्रेयसी सिंह (Bjp MLA Shreyasi singh) यांना रहावलं नाही. त्यांनी जागेवर बसूनच तेजस्वी यादव यांना विरोध केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांनी त्यांना रोखलं आणि उभं राहून बोलण्याची विनंती केली. याचं तेजस्वी यादव यांना देखील आश्चर्य वाटलं, त्यांना श्रेयसी सिंह यांचा सामना करायचा नव्हता. मात्र, काही आमदारांनी श्रेयसी यांना बोलायला भाग पाडलं. क्रिडा विभाग आणि पायाभूत सुविधांबद्दल सुरू झालेली त्यांची चर्चा पार शाळेच्या आठवणींपर्यंत जाऊन पोहचली. ते दोघंही क दोघांनी एकमेकांवर टीका  केली. ते मध्येच हसत होते. विधानसभेत सुरू असलेला हा खेळ पाहून विरोधकही मजे लुटत होते. श्रेयसी सिंह या दिग्विजय सिंह आणि पुतुल सिंह यांची कन्या आहेत. त्यांना जमुईमधून भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. तसेच त्या इंटरनॅशनल शूटर असून त्यांना अर्जुन अवॉर्ड देखील मिळाला आहे. वाचा -  अमित शाह मोटेरावर असताना भाजपचा बंगालमध्ये सिक्सर, या क्रिकेटपटूच्या हातात 'कमळ तेजस्वी यादव आणि श्रेयसी सिंह हे दोघंही शाळेतील वर्गमित्र आहेत. त्यांना श्रेयसी सिंह यांना विधानभवनात पाहून तेजस्वी यादव यांना आनंद झाला होता. त्यांनी यावेळी म्हटली की, मला आनंद आहे की, तुम्ही या सदनाच्या सदस्य झाला आहात. तुम्ही माझ्यासोबत शाळेतही होता, एकाच वर्गात होतो. हा प्रश्न काही तुमचा किंवा माझा नाही. ज्या मुलांना चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाहीये त्यांचा आहे, असं म्हणतं तेजस्वी यादवने श्रेयसी सिंह यांना प्रत्युत्तर दिलं आहे. या चर्चेवेळी दोघेही एकमेकांकडे बघून हसत-हसत बोलत होते. त्यामुळे आजचा दिवस बिहार विधानसभेसाठी अनोखा ठरला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar

    पुढील बातम्या