श्रीनगर, 04 ऑगस्ट: जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे एक मोठा अपघात टळला. श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीला (आरओपी) एक IED सापडले. हे एक्सप्लोझिव्ह टप्पर पट्टनच्या पेट्रोल पंपाजवळील पुलाखाली बसविण्यात आले होते. सैन्यानं वेळेत IED डिफ्यूज केल्यामुळे एक मोठा अपघात टळला आहे.
गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधील 370 कायदा हटवून राज्याला केंद्र शासित प्रदेश घोषित करण्यात आले होते. बुधवारी कलम 370 हटवण्याला एक वर्ष पूर्ण होईल. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी 5 ऑगस्ट रोजी घातपात करू शकतात. यासाठी सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
An Improvised Explosive Device (IED) like object that was recovered by troops of 29RR on Srinagar-Baramulla National Highway was destroyed by bomb disposal squad: Army #JammuAndKashmir pic.twitter.com/2VEgXukYX5
— ANI (@ANI) August 4, 2020
सध्या संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये शोध मोहीम राबविली जात आहे. यासह तातडीने श्रीनगर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हा कर्फ्यू 4 आणि 5 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने कर्फ्यू ऑर्डर जारी केला होता. या आदेशात म्हटले आहे की आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, काही फुटीरवादी आणि पाकिस्तान समर्थित संघटना जिल्ह्यात 5 ऑगस्ट रोजी 'ब्लॅक डे' साजरा करणार आहेत. यामुळे श्रीनगर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की फुटीरतावादी संघटनेचे लोक हिंसक निदर्शने देखील करू शकतात. ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.