मराठी बातम्या /बातम्या /देश /

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय; पत्नी आयुषीला झटका

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय; पत्नी आयुषीला झटका

भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे इंदूरसह देशात एकच खळबळ उडाली होती.

    इंदूर, 16 डिसेंबर : भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात (Bhaiyyu maharaj suicide case) त्यांची दुसरी पत्नी डाॅ. आयुषी यांनी कोर्ट बदलण्यासाठी दाखल केलेला अर्ज कोर्टाने बुधवारी फेटाळला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे त्यांची मुलगी कुहूद्वारे दाखल केलेल्या एका अर्जाला हिरवा कंदील मिळाला आहे. कुहूने कोर्टात एक अर्ज केला होता. त्यानुसार ज्या कोर्टात केस सुरू आहे, तेथेच पुढील सुनावणी सुरू राहावी, अशी विनंती केली होती. वकिलांनी कोर्टात सांगितलं की, डॉ. आयुषी वारंवार समन्स दिल्यानंतरही जबाब नोंदविण्यासाठी येत नव्हत्या. विविध कारणं सांगत कोर्टात येण्यास बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचं म्हणणं होतं की, कोर्टा बदलल्यामुळे पुन्हा प्रक्रिया बराच काळ सुरू राहिलं. कारण दिल्यानंतर कोर्टाने डॉ. आयुषी यांचा अर्ज फेटाळला. जून 2018 मध्ये भय्यू महाराज यांनी आपल्या लायसेन्स रिव्हॉल्वरने त्यांच्या टाऊनशिप बंगल्यात आत्महत्या केली होती. घटनेच्या तब्बल 6 महिन्यांनंतर पोलिसांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या पलक विरोधातही केस दाखल केला होता. भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे इंदूरसह देशात एकच खळबळ उडाली होती. भय्यू महाराज यांची एक सुसाईट नोट सुद्धा घटनास्थळावर आढळून आली होती. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांनी त्यांचा सेवादार विनायक दुधाले, शरद देशमुख आणि पलक पुराणिक यांना अटक करण्यात आली होती. भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sucide case, गरू Bhaiyyu Maharaj

    पुढील बातम्या