नवी दिल्ली 1 एप्रिल : कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीतल्या निजामुद्दीन प्रकरणामुळे कोरोना सर्व देशात पसरण्याचा धोका आणखी वाढलाय. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात सर्वात आघाडीवर आहेत ते डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी. या कर्मचाऱ्यांना या युद्धात आघाडीवर असल्याने जास्त धोका आहे. त्याचबरोबर सुविधांची कमतरता असल्याने या कर्मचाऱ्यांना अनेकदा आपला जीव धोक्यात घालून काम करावं लागत आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांवरही जास्त ताण पडत आहे. हे लक्षात घेऊन दिल्ली सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाच्या लढ्यात ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुबियांना दिल्ली सरकार एक कोटी रूपये देणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. ज्या प्रमाणे शहीदांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते त्याच धर्तीवर ही मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या डॉक्टर्स पासून ते सफाही कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. देशातील (india) कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 240 रुग्ण रुग्ण आढळलेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - देवा! घरी जाण्यासाठी एकाने केली मेल्याची अॅक्टिंग, बनवलं खोट डेथ सर्टिफिकेट भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1,637 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही वाढला आहे. कोरोनाव्हायरसमुळे 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान निजामुद्दीन परिषदेनंतर हा आकडा आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दिल्लीतील कॅन्सर रुग्णालायतील डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे . या डॉक्टरला व्हायरसची लागण कुठून आणि कशी झाली हे अद्याप समजलेलं नाही. त्यानंतर संपूर्ण रुग्णालय सील करण्यात आलं आहे, त्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाते आहे. हे वाचा - लॉकडाऊनमध्ये झाला जुळ्या मुलांचा जन्म, आईने अशी ठेवली कोरोनावरून नावं देशभरात दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे (Nizamuddin Meet) खळबळ माजली आहे. या परिषदेनंतर कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
If anyone loses their life while serving #COVID19 patients, whether sanitation workers, doctors or nurses, their family will be provided Rs 1 crore as respect to their service. Whether they are from private or government sector doesn't matter: Delhi Chief Minister Arvind Kejriwal pic.twitter.com/UJdnHmbC2Z
— ANI (@ANI) April 1, 2020
13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. 2000हून अधिक लोकं या परिषदेला हजर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

)







