श्रीनगर, 31 मे: दक्षिण काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला (terror attack) रोखण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात स्फोटकं (IED) आढळून आली आहेत. भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला होण्यापासून वाचला. अवंतीपोरा येथील पंजगम भागाजवळच्या एका बागेत आयईडी सापडलं. स्फोटकं आढळून येताच भारतीय सैन्यानं Bomb Disposal Squadला पाचारण केलं. त्यानंतर स्फोटकं निकामी करण्यासाठी या ठिकाणी तात्काळ Bomb Disposal Squad दाखल झालं. काही वेळातच या पथकानं स्फोटकं निकामी केलीत.
पुलवामा जिल्ह्यात स्फोटकं (IED) आढळून आली आहेत. pic.twitter.com/1CfdzumP5l
— News18Lokmat (@News18lokmat) May 31, 2021
Bomb Disposal Squad नं हे स्फोटक निकामी केलं आहे. एनआयए या वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्त दिलं असून यासंबंधीचा व्हिडिओही ट्वीटरवर शेअर केला आहे.
#WATCH | Jammu & Kashmir: Security forces recovered & neutralized an IED of approx 10 liters near Panzgam village pic.twitter.com/mqS5UnWABY
— ANI (@ANI) May 31, 2021
दोन आठवड्यापूर्वीही दक्षिण पुलवामा जिल्ह्यात 10 किलोची स्फोटकं जप्त करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्वीटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी आयईडी हल्ले करण्याची प्रयत्नात आहेत.