Home /News /national /

मोठी बातमी: News Channels चा TRP पुन्हा होणार सुरू, माहिती प्रसारण मंत्रालयाचे BARC ला आदेश

मोठी बातमी: News Channels चा TRP पुन्हा होणार सुरू, माहिती प्रसारण मंत्रालयाचे BARC ला आदेश

भारतातील News Channels चा TRP तातडीने सुरू करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण खात्याने BARC ला दिले आहेत.

    नवी दिल्ली, 12 जानेवारी: देशातील वृत्तवाहिन्यांचा (News Channels) टीआरपी (TRP) जाहीर करायला सुरुवात करा, असे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Information and Broadcast Ministry) बार्क (BARC) या संस्थेला दिले आहेत. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी कऱण्यात यावी आणि गेल्या तीन महिन्यांच्या टीआरपीचे आकडेही जाहीर करण्यात यावेत, असं या आदेशात म्हटलं आहे. वृत्तवाहिन्यांचा टीआरपी गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला होता, तो या आदेशानुसार आता पुन्हा सुरू होणार आहे.  काय आहे आदेश? टीआरपी कमिटीचा रिपोर्ट आणि ट्रायच्या सूचनांच्या आधारे टीआरपी मोजण्याच्या आणि सादर करण्याच्या पद्धतीत काही मूलभूत बदल करण्यात येणार आहेत. यानुसार न्यूज आणि निश कॅटेगरीतील वाहिन्यांचा टीआरपी हा ‘फोर विक रोलिंग ऍव्हरेज’ या निकषावर मोजला जाणार आहे. टीआरपी मोजण्याची प्रक्रिया, पद्धती, पर्यवेक्षण आणि टीआरपी मोजणी प्रक्रियेचं व्यवस्थापन यात काही मूलभूत बदल केले जाणार आहेत. बोर्ड आणि तांत्रिक कमिटीची पुनर्रचना केली जाणार असून काही स्वतंत्र सदस्यांनाही या प्रक्रियेत समाविष्ट केलं जाणार आहे.  निरीक्षक समितीची स्थापना टीआरपीची प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी कायमस्वरूपी निरीक्षण समितीची (Permanent Oversight Committee) स्थापना करण्यात येईल, अशी माहिती बार्ककडून देण्यात आली आहे. टीआरपीचा तपशील आणि प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी यंत्रणा राबवण्यात येणार आहे. देशातील वेगवेगळ्या भागांना भेटी देऊन बदललेले नियम आणि निकष यांची माहिती देण्याचं काम बार्कच्या वतीनं करण्यात येईल, असं प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.  वर्किंग ग्रुपची स्थापना प्रसार भारतीच्या सीईओंच्या अध्यक्षतेखाली एका वर्किंग ग्रुपची स्थापना करण्याची घोषणाही या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. टीआरपी सेवेसंबंधी ‘रिटर्न पाथ डेटा’बाबतचं धोरण ठरवण्याचं काम हा ग्रुप करणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Central government, Television, Trp meter

    पुढील बातम्या