लखनौ, 4 मार्च : उत्तर प्रदेश विधानसभेने अलीकडेच एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्यासह पाच पोलिसांना विशेषाधिकार भंग प्रकरणात एक दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 15 सप्टेंबर 2004 साली आमदार सलील विश्वनोई यांना मारहाण झाली होती. या प्रकरणात या आयएएस अधिकाऱ्याचेही नाव होते. हे अधिकारी कोण आहेत? ज्यांना यूपी विधानसभेत पोलिसांसह एक दिवस तुरुंगात काढावा लागला. यूपी विधानसभेत तब्बल 58 वर्षांनंतर अशा प्रकारची शिक्षा ठोठावण्याचं प्रकरण घडलं आहे.
वाचा - जिथं चिन्यांना पळूपळू मारलं, तिथेच रंगलाय क्रिकेटचा डाव; तुम्हालाही वाटेल अभिमान
कोण आहेत अब्दुल समद?
यूपी विधानसभेच्या तुरुंगात एक दिवस घालवलेले माजी आयएएस अधिकारी अब्दुल समद हे पहिले यूपी पीसीएस अधिकारी होते. 2004 मध्ये कानपूरमध्ये आमदार सलील विश्वनोई यांच्याशी गैरवर्तन झाले तेव्हा अब्दुल समद हे कार्यक्षेत्र अधिकारी म्हणजेच सीओ होते.
अब्दुल समद 2009 मध्ये आयएएस झाले
अब्दुल समद हे 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात त्यांना पीसीएसमधून पदोन्नती देण्यात आली आणि त्यांना यूपीच्या उच्च शिक्षण विभागाचे विशेष सचिव करण्यात आले. याआधी ते गाझियाबाद महानगरपालिका आयुक्त पदावर होते.
यापुढे अराजकता चालणार नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भविष्यातील सणांमध्ये धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा पूर्ण सन्मान केला जाईल. परंतु, अराजकता स्वीकारली जाणार नाही. येत्या काही महिन्यांत येणाऱ्या होलिकोत्सव, शब-ए-बारात, रमजान, नवरोज, चैत्र नवरात्री, रामनवमी इत्यादी महत्त्वाच्या सणांच्या शांततेत आयोजन करण्याच्या संदर्भात योगी यांनी सरकार आणि जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्यांना विचारणा केली आहे. झोन आणि सर्कल स्तरावर तैनात पोलीस आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
सीएम योगी म्हणाले की, येत्या काही महिन्यांत सणांच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मिरवणुका, यात्रा इत्यादींचे आयोजन केले जाईल. परंतु, हा काळ कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. ते म्हणाले, “आपल्याला सतत सतर्क राहावे लागेल. गेल्या सहा वर्षांपासून राज्यात सर्व धर्म आणि पंथाचे सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात आयोजित केले जात आहेत. हा क्रम भविष्यातही कायम ठेवावा लागेल.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pardesh